दिनांक २०/११/२२ रोजी गौळवाडी येथील तेली समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेला महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा अध्यक्ष ( कोकण विभाग ) श्री. डाॅ. सतीश वैरागी साहेब, तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश महाडिक साहेब, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे साहेब हया सर्व पधादिकारी मंडळीनी तेली समाज कर्जत यांस सदिच्छा भेट दिली.
रायगड जिल्हा संपर्क मेळावा पाली येथे दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केला आहे, त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सर्व गौळवाडी, कशेळ, सुगवे, किरवली, कर्जत तालुक्यातील मोठ्या संख्येत जमलेल्या सर्व पधादिकारी वर्गाचे पुष्पगुचछ व श्रीफळ देऊन आभार मानले.
श्री. डाॅ. सतीश वैरागी साहेब यांनी तेली समाज सक्षम करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन कसे काम केले पाहिजे याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. अपल्या कर्जत तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यातून आपले तेली समाज बांधव रहात आहेत त्यासर्वांचे संपर्क साधून त्याना अपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक एकत्री करणाचे महत्व पटवून देत आहेत. संघटन कसे महत्व आहे ते का हवा आहे हे सांगितले. आपली संस्था केवळ कर्जत रायगड पुरती मर्यादीत नसुन संपुर्ण महाराष्ट्रात काम करते असे ते म्हणाले. संस्थेच्या महाराष्ट्र राज्य पदाधिकारी आणि त्यांच्या समाज कार्या विषयी माहिती सांगितली. आणी आपल्या ओबीसींचे आरक्षण कसे कमी करत आहेत त्या साठी आपण एकत्रित येऊन काम करने आवश्यक आहे याचे महत्व सांगितले खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
श्री. गणेशजी महाडिक साहेब यांनी सुद्धा संस्थेच्या कार्या विषयी माहिती सांगितली.समाजिक बांधिलकी कशी जपावी आणि वरीष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाने मिळणारी प्रेरणा अशा अनेक गोष्टी सांगितल्या.अनेक मुद्यांवर उत्कृष्ट रीत्या मार्गदर्शन केले. श्री क्षीरसागर साहेब यांनी उत्कृष्ट उत्कृष्ट रीत्या मार्गदर्शन केले. आणि समाज एकत्रित केला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले. श्री वसंत पिंगळे साहेब यांनी उत्कृष्ट रीत्या मार्गदर्शन केले. श्री. डाॅ. सतीश वैरागी साहेब हे आजारी असून संघटना एकत्र आणण्याचे काम करत आहेत तर आपल्या पण त्यासाठी हातभार लाऊन संघटनेने काम केले पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले. श्री. गणेश धोत्रे साहेब श्री. संतोष भोज साहेब यांनी मिटींग साठी मोठ्या संख्येने जमलेल्यासर्व गौळवाडी, कशेळ, सुगवे, किरवली, कर्जत तालुक्यातील समाज बांधव आणि भगिनी उपस्थित राहिल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.