धुळे - तेली समाजाचे संत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून धुळे शहर व जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती अथवा प्रतिमा पूजन केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती किंवा प्रतिमा पूजन करण्याविषयी आदेशित करण्यात यावे व सर्व कार्यालयांमध्ये संताजी महाराजांचे प्रतिमापूजन करण्यात यावे अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय गायकवाड साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी शासकीय परिपत्रकाचा भंग होत असून त्या परिपत्रकाप्रमाणे बरेच शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती साजरी केली जात नाही हे निदर्शनास आणून देण्यात आले. श्री गायकवाड साहेब यांनी त्वरित तसे आदेश काढत असल्याचे सांगून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये या वर्षापासून जयंती निश्चितपणे साजरी होईल व तसे आदेश लगेच काढत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी यांनी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.