तैलिक महासभेच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी वेल्हे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व महासभेचे सचिव भूषण कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली देशमाने यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात एका कार्यक्रमात देशमाने यांचा निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला. नामदेव माळवदे, घनश्याम वाळुंजकर, गणेश चव्हाण, अध्यक्ष रविकुमार शिंदे, लक्ष्मण हाडके, बाळासाहेब अंबिके, प्रकाश कर्डीले, श्रीधर शेलार, मारुती नगिने, बाबा वाळुंजकर आदी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade