महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या नवनिर्वाचित पुणे विभागीय सचिव ,उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष ,उत्तर पुणे जिल्हा सचिव यांचा राजगुरूनगर तेली समाजाच्या वतीने सत्कार
राजगुरूनगर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे विभाग पदाधिकाऱ्याची निवड राजगुरूनगर येथे रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, आणि महासचिव डॉ भूषण कर्डीले यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन झाली.
प्रांतिक महासभेच्या पुणे विभागीय सचिव पदी श्री प्रदीप कर्पे यांची तर उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदी श्री अविनाश कहाणे यांची फेर निवड झाली उत्तर पुणे जिल्हा सचिव पदी श्री संजय फल्ले यांची निवड झाली अविनाश कहाणे हे राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी झाले राजगुरूनगर तेली समाजाच्या विश्वस्त असलेल्या या तीनही पदाधिकाऱ्यांचा सत्कार राजगुरूनगर तेली समाजाने केला राजगुरूनगर येथील श्री संजय हरिदास चौधरी यांची कन्या चि. सौ. कां. कल्याणी व आंबोली चे शिंदे गुरुजी यांचा चिरंजीव अरुण यांच्या लग्नाची आमंत्रण मीटिंग प्रसंगी सत्कार करण्यात आले. संजय चौधरी यांनी समाजाला दिनांक 29 नोव्हेंबर रोजी त्यांचे मुलीच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.
या मीटिंग मध्ये संताजी महाराज जगनाडे यांची जयंती राजगुरूनगर तेली समाजाने 8 डिसेंबर 2022 रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले समाजाने संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमेची भव्य मिरवणूक 8 डिसेंबर रोजी राजगुरूनगर शहरातून काढण्याचे ठरले प्रसंगी राजगुरूनगर तेली समाज अध्यक्ष अनिल कहाणे सर्व संचालक तेली समाज राजगुरूनगर व समाज बांधव व चौधरी कुटुंब उपस्थित होते शेवटी राजगुरूनगर तेली समाज उपाध्यक्ष श्री बाळासाहेब उर्फ सोमनाथ कहाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले