नंदुरबार : भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची भाजपच्या प्रदेश महामंत्रीपदी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने नंदुरबार जिल्हयास पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा केली. नंदुरबार जिल्हयास भाजपने प्रथमच प्रदेश महामंत्रीपद दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा, केंद्रीय संघटन सरचिटणीस संतोष यांच्या मान्यतेनुसार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय चौधरी यांना प्रदेश कार्यालयात बोलावून नियुक्ती पत्र दिले.
उत्तर महाराष्ट्रातील संघटन करण्याची जबाबदारी विजय चौधरी यांच्यावर सोपविली आहे. याप्रसंगी संघटन मंत्री विक्रांत पाटील, संघटन मंत्री माधवी नाईक, प्रदेश प्रवक्ते किशोर उपाध्ये उपस्थित होते. या नियुक्तीमुळे राज्यातील पदाधिकाऱ्यांकडून चौधरी यांचे कौतुक करण्यात आले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade