वर्धा : कोणताही समाज एकजूट राहिला तर आपले लक्ष्य पूर्ण करू शकतो. समाजाने एकजूट होऊन येणाऱ्या काळात आपल्या समाजाचे बळ वाढवावे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची नवीन ऊर्जा प्राप्त होते. समाजाचे भव्य मेळावे संदुबरे नागपूर येथे आयोजित केले होते, त्यापेक्षाही मोठा मेळावा २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्ह्याच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात ते वर्धा येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रामदास तडस होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजू शेलार, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, राजेश बकाणे, बळवंत मोटघरे, नाना ढगे, रवी बालपांडे, प्रवीण हिवरे, मिलिंद भेंडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रशांत सव्वालाखे, अनिल देवतारे, जगदीश वैद्य, शोभा रा. तडस, पुष्पा इयगव्हाने, स्नेहा देवतारे, नयना झाडे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा वर्धा जिल्हा युवक आघाडीतर्फे २०२३च्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
गजूनाना शेलार, भूषण कर्डिले यांनी समाजकार्य करताना मी कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, हे विसरून समाजकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन जिल्हाध्यक्ष व युवक आघाडीचे कार्याध्यक्ष अतुल वांदिले व प्रदेश उपाध्यक्ष विपीन पिसे यांनी केले. सूत्रसंचालन नीळकंठ पिसे यांनी केले तर संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर चाफले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्नेहमिलन सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष चंद्रकांत चामटकर, किशोर गुजरकर, अभिषेक उराडे, विशाल उराडे, वैभव तिजारे, चंदू वाघमारे, महेश हटवार, शार्दुल वांदिले, दीपक भुते, एकनाथ डाहाके, भूषण पारडकर, वैभव राऊत, सागर झाडे, वैभव उगेमुगे, अमित गोमासे, किशोर सोनटक्के, नीलेश वैद्य, धीरज लेंडे, चंद्रकांत डफ, धीरज गफने, अश्विन साहू, हरिश पिसे, रविकांत बडवाईक, शुभम साहू, कार्तिक साहू, सौरभ साहू, यशवंत बडवाईक, अक्षय शेंडे, आकाश शेंडे, प्रकाश झाडे, विजय साहू, पंकज खंगार, आशिष वैद्य, विलास आगे, जितेंद्र पोटदुखे, दुर्गेश मुडे, विनोद इटनकर, संचित गुल्हाने यांनी परिश्रम घेतले.