पांगरखेड - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंतीनिमित्त समाज प्रबोधनपर व्यखानाचे आयोजन ८ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जगद्गरु श्री. संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त समाज प्रबोधनपर युवा व्याखानकार 'अविनाश भारती' यांच्या व्याखानाचे आयोजन ८ डिसेबर रोजी सायंकाळी ६ वाजता पांगरखेड करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही ब्राह्मणांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले अशी अख्यायिका आहे. संताजीनी केलेलेल्या कार्याचे हे युवा पिढीच्या स्मरणात रहावे म्हणून श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त समाज प्रबोधनपर युवा व्याखानाचे आयोजन करण्यात आले. या बरोबर सकाळी १० वाजता आरती व प्रसादाचे आयोजन हे गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशितील श्रोत्यांनी कार्यक्रमासाठी असंखेने उपस्थित रहावे असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.