नगर - श्री संत शिरोमणी संताजी महाराज जनागडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत कृत्रिम दंतरोपण व रूट कॅनल शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा, नगर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व श्री संताजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ८ डिसेंबर सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी, श्री संताजी नागरी पतसंस्था, तेली पंचाचा वाडा, डाळमंडई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मोफत दंत रोग तपासणी शिबिरांमध्ये कृत्रिम फिक्स दात बसवणे, एका दिवसात रूट कॅनल व कॅप, वेडेवाकडे दात सरळ करणे, लहान मुलांचे एका दिवसात रूट कॅनल, तसेच व्यसनांमुळे कमी उघडणाऱ्या तोंडावर उपचार, दातात सिमेंट चांदी भरणे यासारख्या उपचारांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असे दंततज्ञ डॉ. सुदर्शन गोरे यांनी सांगितले.
तसेच औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. मोफत दंत तपासणी करण्यासाठी नाव नोंदणी ९०२८३०६०२० या नंबरवर संपर्क साधावा. या दंतरोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व श्री संताजी नागरी पतसंस्था यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे. शिबिराचे नियोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, युवा आघाडी अध्यक्ष गणेश धारक, सहसचिव उमाकांत डोळसे, अनिल देवराव, शुभम भोत, चैतन्य देवराव, चैतन्य डोळसे, कालिदास क्षीरसागर, महेश करपे, संतोष शेंदुरकर व योगेश भागवत यांनी केले आहे.