राजगुरूनगर येथे तेली समाज कार्यालयात गुरुवार दिनांक 08/12/2022 रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांची 398 वी जयंती साजरी करण्यात आली, संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, आपल्या भाषणात जयप्रकाश कहाणे, माजी चिटणीस तेली समाज राजगुरूनगर, सोमनाथ कहाणे, उपाध्यक्ष, तेली समाज, राजगुरूनगर, प्रदीप कर्पे, विभागीय सचिव, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तथा चिटणीस, तेली समाज राजगुरूनगर यांनी संताजी महाराजांचे चरित्र व कार्य याबाबत विचार व्यक्त केले.
अभिवादन सभेला प्रमुख अतिथि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभागीय अधिकारी, मा मनीष ठाकरे हे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणात संताजी महाराजांचे कार्य याबाबत सांगितले. उत्कृष्ठ कार्याबद्दल डॉक्टर रमेश शिंदे, शामा खळदकर , अशोक पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी तेली समाज राजगुरूनगर अध्यक्ष अनिल कहाणे, उपाध्यक्ष सोमनाथ कहाणे, नितीन कहाणे, खजिनदार तथा उत्तर पुणे जिल्हा तैलिक महासभा अध्यक्ष अविनाश कहाणे, चिटणीस तथा पुणे विभाग तैलिक महासभा विभागीय सचिव प्रदीप कर्पे , सह चिटणीस तथा उत्तर पुणे जिल्हा सचिव संजय फल्ले ,तेली समाज संचालक ताराचंद दहितुले, ह. भ. प. नामदेव महाराज कहाणे , दिलीप लोखंडे, किशोर मावळे, सुधीर येवले शामा खळदकर उपस्थित होते
अभिवादन सभेस सर्वश्री अजय उर्फ मामु कहाणे, डॉक्टर रमेश शिंदे, शशी अप्पा कहाणे, मनोज कहाणे, सुनील कहाणे, गणेश कहाणे, सचिन कहाणे, उल्हास कहाणे, शंकर कहाणे, अमोल कहाणे, सुनील मावळे, विलास वालझाडे, मुकुंद येवले, बाळासाहेब केदारी, भारत हाडके किसन पाबळ कर, उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय फलले यांनी व आभार उपाध्यक्ष नितीन कहाणे यांनी मानले