जवळे : श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८व्या जयंती जवळे (ता. पारनेर) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय, धर्मनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात तिळवण तेली समाज व विद्यालयाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. जवळे ग्रामपंचायत कार्यालयातही जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच गोरख शिवाजी पठारे, भाऊसाहेब किसन शेलार, मदन कृष्णाजी रत्नपारखी, प्राचार्य संजय नवले, तिळवण तेली समाज संघटनेचे उपाध्यक्ष शिरीष शरद शेलार. ग्रामपंचायत सदस्य काळूराम साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी धर्मनाथ विद्यालयाचे पर्यवेक्षक गोरक्षनाथ शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख समीर काळे, हारूण गावित प्रवीण चाटे, राजेंद्र खोसे, मनेष कारखिले, शिक्षक, महेश शेलार, मधुकर लोखंडे, शिवाजी लोखंडे, ग्रामपंचायत कर्मचारी किरण शिंदे, कविता खुपटे, आदी उपस्थित होते.
सन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री संताजी महाराज जगनाडे यांना राष्ट्रीय संत म्हणून घोषित केले. त्यामुळे प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात जगनाडे महाराजांची जयंती साजरी केली जाते.