मुदखेड, दि. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासन परिपत्रकानूसार शहरातील मुदखेड तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये
साजरी करण्यात आली.
येथील तहसीलदार सुजीत नरहारे यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालयात सकाळी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक जनार्दन पिन्नलवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, मुख्याध्यापक बेबडे, मारोती पाटील पवार, माऊली पाटील, साईनाथ पाटील, पांडूरंग वच्छेवार, पेशकार महेश गाजूलवाड, महसूल सम्यक बालाजी माने, नागेश सुर्यवंशी, राजु गुतापल्ले, पत्रकार साहेबराव गागलवाड, श्रीमती वनता अवसेकर, रेखा समईकर, मसुर बेग, सुलतान पठाण, रामकृष्ण कुलकर्णी, एकनाथ तारु, माजी उपसरपंच निखाते, ईश्वर पित्रलवार आदि उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचायत समितीत कै शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी दासरवार एस. व्ही., सोसुने, मोटरवार एल. एन. सहाय्यक लेखाधिकारी, पी. व्ही. हंबर्डे विस्तार अधिकारी आरोग्य, श्रीमती. एस. एन. मेटकर श्रीमती येमेकर, भांगे, श्रीमती यलकेवाड, रजत अंबुलगेकर, साईनाथ बिलोलीकर, अब्दुल जावेद, रामकृष्ण कुलकर्णी, विद्याधर तहकिक, गोडबोले, श्रीमती सुनिता तलेदवार आदि उपस्थित होते. दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलमध्ये झालेल्या जयंती कार्यक्रमात मुख्याध्यापक विजयकुमार बेबडे, शिक्षक ज्ञानेश्वर बायस, तुकाराम नाहनळे, तिरोपती पवार, गंगाधर पोगरे, गुजरवाड गोपीनाथ, गजानन दुडकीकर, बालाजी खेळकर, महाजन जाकापुरे, देवठाणकर उपस्थित होते.