दि.8/12/2022 रोजी नागपूर येथील नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातील संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला, महाराजांजच्या जयंती निमित्त, अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था व वर वधू सुचक मंडळा तर्फे आयोजित जयंती समारंभात तेली समाजाचे आराध्य दैवत व जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या बारा टाळकऱ्यापैकी एक व तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत आपल्या लेखणीने लिहुन काढणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास संस्थेचे सल्लागार व सदस्य डॉ.अशोकराव सागोते ,बबनराव तेलरांधे,गिताताई महाकाळकर व कृतल आकरे, संस्थेचे अध्यक्ष अरूणराव धांडे यांच्या कडुन हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या शुभप्रसंगी संस्थेचे सचिव किशोर भिवगडे, वसंतराव खोंड,राजुजी मुंडले, श्रीकांत क्षिरसागर, पियुश आकरे, भोजराज मस्के बालु गुळघाणे, सुर्यभान चकोलेजी, पियुश आकरेजी प्रामुख्याने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade