संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांचे सर्वात लहान (केवळ दिड सेंटीमीटर ) खडूशिल्प साकारले आहे. अहमदनगरचे चित्र - खडूशिल्पकार अशोक डोळसे यांनी. या गोल व्यक्तिशिल्पाच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य व अध्यात्मिक भाव दिसत आहे . उर्वरीत खडूशिल्पावरश्री. संताजी महाराज यांनी लिहिलेली " तुकाराम गाथा " मागे संत श्री. तुकाराम महाराजांचा आवडता भंडारा डोंगर, मागतील बाजूस त्रिगुणात्मक तेली व्यवसायाचे मूळ प्रतिक तेलघाणा कोरला असून त्याजवळ सध्या अस्तीत्वात असलेली संदुबरे येथील समाधी उपस्थित शिल्पातून दर्शविली आहे. हे सर्व शिल्प एकाच तीन इंच बाय दहा एम एम वर्तुळाच्या खडूवर साकारले आहे.