धुळे - तेली समाजाचे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे शहरात संपूर्ण तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली.
यामध्ये खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने धुळे शहरातील गुरु शिष्य स्मारकाजवळ समाज जागृती व प्रबोधनासाठी मशाल फेरी काढण्यात आली. रक्तदान शिबिर, ध्वज स्तंभाचे पूजन, ध्वज वंदन, अनावरण व संताजी महाराजांचे पुतळ्यांचे पूजन आरती इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी सात वाजता कुसुंबा तेली समाजाने आयोजित केलेल्या समाज जागृती व प्रबोधनासाठी मशाल यात्रेचे स्वागत व शुभारंभ गुरु शिष्य स्मारका जवळून करण्यात आला . खान्देश तेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी कुसुंबा तेली समाज चे सर्व महिला पुरुष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नऊ वाजता मंडळाच्या मुख्य कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर दहा वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक कैलास काळू चौधरी यांनी रक्तदान करून केले. यावेळेस रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमास हातभार लावला. त्यानंतर संताजी महाराजांच्या पुतळ्यांचे पूजन व माल्यार्पण करून वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली भगवी पताका स्मारकासमोर कायम फडकत राहावी म्हणून ध्वज स्तंभ उभारण्यात येऊन स्तंभाचे पूजन, ध्वजवंदन विरोधी पक्षनेत्या सौ.कल्पना काकू महाले ,नगरसेवक संदीप तात्या महाले ,माजी सभापती सतीश तात्या महाले, नरेश अप्पा चौधरी,विनोद थोरात, नरेंद्र चौधरी, मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी ,सचिव रवींद्र जयराम चौधरी, मनोज मधुकर चौधरी, समितीचे अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर नागरिक महिला बंधू भगिनी उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, जगन्नाथ शंकर चौधरी, प्रमोद धोंडू चौधरी, किशोर बोरसे ,दीपक नवल चौधरी, सुनील तात्या चौधरी,महिला मंडळाच्या मालती चौधरी ,सविता चौधरी ,शुभांगी चौधरी ,रंजना चौधरी ,भारती चौधरी , समिधा सूर्यवंशी, वंदना चौधरी, मनीषा चौधरी, प्रतिभा चौधरी, रिटा बागुल, कमलेश चौधरी, श्याम चौधरी सर्व पदाधिकारींनी प्रयत्न केले.