कळंब दि.८ - प्रतिवर्ष प्रमाणे या ही वर्षी संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३९८ वी जयंती तेली समाज सेवाभावी संघा च्या वतीने संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मठ कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व आरती तसेच वृक्ष रोपण लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आबा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी संतशिरोमणी संताजीं जगनाडे महाराज यांच्या जिवन कार्यावर विचार व्यक्त करताना जगनाडे महाराज यांच्या कुटुंबात वारकरी परंपरा असल्याने त्यांच्यावर लहानपणा पासूनच वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. वयाच्या सोहळ्याव्या वर्षी ते संत तुकाराम महाराज यांच्या संपर्कात आले. तसेच ते पुढील काळात संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख टाळकरी पैकी एक बनले. त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग-ओवी मुखोद्रत केलेली होती. समाज कंठकांनी गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडविल्या नंतर संत जगनाडे महाराजांनी पूर्नलिखान करून संत तुकाराम महाराजांची गाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. व तसेच त्यांनी विपूल प्रमाणात अभंग रचना केली आहे. त्यांनी तेलघाण्याचे आभंग लिहीले.
आमुचा तो घाणा । त्रिगुण तिळाचा ।।
नंदी जोडीयाला । मन पवनाचा ॥
भक्ती हो भावाची । वाट दाकीयाली ||
शांती शिला ठेवली । विवेका वरी ।।
संतू म्हणे मी तेल काढीईले । म्हणूनी नाव दिले संतू तेली।। *
असे सांगून माधवसिंग राजपूत यांनी संताजी महाराज जगनाडे यांचे विचारसमाजा पर्यंत पोहचविण्याचे काम करावे असे आवाहन केले. या प्रसंगी प्रकाश भडंगे. भास्कर
सोनवणे.गोकुळ बरकसे यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तेली समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक चिंचकर यांनी केले. या वेळी शैलेश महाराज स्वामी. सचीन देशमाने. लक्षमण आबा फल्ले. कैलास बागल. निलेश होनराव बाळकृष्ण गुरसाळे नाना शिंगणापूरे. विश्वंभर किरवे. संभाजी किरवे. आश्रूबा शेवते . मच्छिंद्र साखरे. दत्ता शेवडे. अशोक फल्ले. परशुराम देशमाने. रामलिंग कानडे.. संदीप शेवते. गणेश शेवते यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सचिन देशमाने. आशोक चिंचकर मनोज फल्ले. गणेश शेवते.गजानन मुंडे.मनोज फल्ले. विशाल फल्ले. रोहीत किरवे. राहुल किरवे. आकाश चिंचकर . किरण फल्ले आदींनी परिश्रम घेतले...!