चोपडा तेली समाजाची संस्था श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा व चोपडा तालुका महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा चोपडा अशा विविध संस्थांच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.
संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे तेली समाज मंगल कार्यालयात संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन माल्यार्पन करण्यात आले बावेळी संताजी महाराजांची आरती म्हणण्यात आली. श्री के. डी. चौधरी अध्यक्ष प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना अभिवादन केले. यावेळी शशिकांत सुभाष चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी चोपडा तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्षा तथा तेली समाजाचे - उपाध्यक्ष सौ योगीता चौधरी यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.
संताजी महाराज महाराजांचा जयघोष करत उपस्थितानी भजनाचा आनंद घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुदायिक रित्या संताजी जगनाडे महाराज यांच्या आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला.. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत सुभाष चौधरी, श्रीकांत चौधरी नगरसेवक बापू चौधरी, हरिबोल महाराज, ज्ञानेश्वर नेरकर, देवकांत चौधरी, गुलाब चौधरी आदी मान्यवर उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष टी. एम. चौधरी यांनी संताजी महाराजांचा परिचय देऊन संताजींच्या कार्याचा गौरव केला. होता संताजींचा माथा म्हणून वाचली तुकारामाची गाथा. अशा शब्दात त्यांनी संताजींचे वर्णन केले. संताजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आभार भिका चौधरी यांनी मानलेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade