नगर - संतांचे विचार हे आपले जीवन सुखी करण्यासाठी आहेत. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्ती करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे. या कार्यात प्रत्येकाने योगदान दिल्यास एक चांगला समाज निर्माण होईल.. यासाठी आपणही सहकार्य करु, असे शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.
श्री संत संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने विठ्ठल-रुख्मीणी मंदिर येथे त्यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव प्रसाद शिंदे, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निता लोखंडे, शोभना धारक, विक्रम शिंदे, किरण धारक, योगेश भागवत, चैतन्य देवराव, निशिकांत शिंदे, व्यंकटेश जोशी, विष्णू नागापुरे, अशोक डोळसे आदिंसह समाज बांधव उपक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्तविकात सागर काळे म्हणाले, तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने वर्षभर विविध राबवून समाजाची प्रगती साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, त्यांच्या कला- गुणांचा गौरव, महिलांसाठी स्वयंरोजगार, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी याबरोबरच कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात देऊन समाज जोडण्याचे काम सुरु आहे. संत जगनाडे महाराजांच्या जयंती- पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमातून समाज संघटनेचे काम ट्रस्ट करत असल्याचे सांगितले.
प्रसाद शिंदे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या कार्याचा गौरव करुन ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डोळसे यांनी केले तर आभार मनोज क्षीरसागर यांनी मानले.