नगर महाराष्ट्राला अनेक संतांची मोठी परंपरा आहे, या संतांनी आपल्या त्यागातून समाजाला जागृत करून दिशा देण्याचे काम केले आहे. संत संताजी महाराजांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत समाजोन्नत्तीचे काम केले त्यांचे विचार आणि कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार जीवनात प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. तिळवण तेली समाज ट्रस्ट त्यांच्या विचारावर काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना कला-गुणांना वाव देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्नेहालयाचे डॉ. गिरिष कुलकर्णी यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने संताजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्नेहालयाचे डॉ. गिरिष कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव प्रसाद शिंदे, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ. निता लोखंडे, सौ. शोभना धारक, विक्रम शिंदे, किरण धारक, योगेश भागवत, चैतन्य देवराव, निशिकांत शिंदे, व्यंकटेश जोशी, विष्णू नागापुरे, अशोक डोळसे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे सचिव प्रसाद शिंदे म्हणाले, ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमातून समाजाला फायदा होत आहे. समाजाच्या प्रगतीसाठी ट्रस्ट कटीबद्ध असून, संत जगनाडे महाराजांचे विचार व कार्य सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम आपणा
सर्वांना करावयाचे असल्याचे सांगितले.
या स्पर्धेचे परिक्षण नंदकुमार देशपांडे, राजेंद्र धस, विवेक भारताल, वृषाल एकबोटे, सौ. हर्षदा डोळसे, शुभदा डोळसे, गौरी शिंदे यांनी केले.
चित्रकला स्पर्धेतील विजेते अनुक्रमे गट क्र.१ - तनिष चौधरी, रितेश ठुबे, आयुष राऊत, अनुजा रायपेल्ली, वेदीता खरपुडे. गट क्र.२ - वृंदा घोडे, अमय कदम, आरव म्हस्के, पुजा ताटी, अनिष मंत्री. गट क्र. ३- अपुर्वा नांदुरकर, राजनंदिनी जाधव, खुशी कुटे, ओवी भिंगारे, करुणा बोरुडे. गट क्र.४ - संदेश मगर, वरद घोडे, आर्या निंबाळकर, मांगल्या धोत्रे, रेहान मुलानी. गट क्र. ५ - अर्चना ताटी अन्वेशा मंत्री, विठ्ठल लयचेट्टी, नक्षत्रा शिंदे, वेद मुंगी. खुला गट- केशर मुसळे, सानिका क्षीरसागर, सोनल तरटे, रुपाली मेहेत्रे, ए. आर. क्षीरसागर. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके तर सहभागींनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक डोळसे यांनी केले तर आभार सागर काळे यांनी मानले. याप्रसंगी समाज बांधव, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.