शिर्डी - संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्ताने शिर्डी शहर तेली समाज व शिर्डी नगरपरिषद शिर्डी यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी येथे सकाळी ९:०० वाजता अभिषेक पूजा दिलीप भाऊ राऊत व सौ आशाताई राऊत यांच्या हस्ते संपन्न झाली तर सकाळी १०:३० वाजता शिर्डी नगर परिषदेत मध्ये मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे साहेब व प पु शंकराचार्य महाराज, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख व लोकनेते कमलाकर कोते पाटील यांच्या शुभ हस्ते संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा पूजन करून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवर व परमपूज्य शंकराचार्य महाराज यांचा सत्कार जेष्ठ मार्गदर्शक यशवंतराव वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तेली समाज जिल्हाध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे, जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे, शहर कार्याध्यक्ष सोमनाथ महाले, जेष्ठ मार्गदर्शक यशवंतराव वाघचौरे, रवींद्र कर्डीले, रविंद्र महाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शशिकांत महाले, सौ. अंजली ताई कोते मॅडम, . सचिन लुटे, प्रशांत कवडे, नंदकुमार व्यवहारे, दिलीप चौधरी, राजू पाडसवान, विठ्ठल जाधव, गणेश मिसाळ, मंगेश जिभकाटे सर, सुरेंद्र महाले व समस्त तेली समाज बांधव व शिर्डी नगर परिषद कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगतगुरु शंकराचार्य यांनी घेतले साई बाबांचे दर्शन.
आज परमपूज्य जगतगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ जी महाराज हे शिर्डीत साई दर्शनाला आले असता त्यांनी साई मंदिरात जात मनोभावे साईबाबांचे दर्शन घेत पाद्यपुजा केलीय.
यावेळी त्यांच्या समवेत आसामचे मंत्री बोलिन चोटिया, शिर्डीतील शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, राजेंद्र देवकर, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम बाघ, शिवाजी दिशागत, साई निर्माणचे विजय कोते, चंद्रकांत गायकवाड यांसह मोठ्या संख्येने भाविक गण उपस्थित होते.
पुरी जगन्नाथ पिठाचे शंकराचार्य स्वामींनी बारा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दर्शन भ्रमण करत असताना महाराष्ट्र दर्शन दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथून शिर्डीत येत शंकराचार्यांनी साई दर्शन घेतले शिर्डीत सिद्ध पुरुष साई बाबांचे दर्शन घेऊन मनाला आनंद झाल्याचे सांगत शिर्डीत अध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती झाल्याचे सांगत बाबांकडे राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले. कमलाकर कोते आणि विजय कोते यांनी यावेळी त्यांचा यथोचित सन्मान केला व साईबाबांची शाल आणि उदी त्यांना भेट स्वरूपात दिली जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डीत सर्व दर्शन तसेच निवासाची सुंदर व्यवस्था केली तसेच संस्थानच्या कर्मचाऱ्यांची वागणूक सुद्धा अतिशय नम्रपणे असल्याचे दिसून आल्याचे शंकराचार्यांनी सांगितले.