अकोला, ता. ८ : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जंयती उत्सव गुरुवार, ता. ८ डिसेंबरला राठोड पंच बंगला शिवाजीनगर अकोला येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम संताजी महाजारांच्या मूर्तीचे पूजन, दिपप्रज्वलन करण्यात आले, प्रास्ताविकमध्ये संताजीच्या जीवन चरित्राची गाथा तेली समाजाचे सचिव गजानन बोराळे यांनी विशारद केले. व्यासपीठावर, अध्यक्ष दिलीपराव नायसे, रामरावजी बोराखडे, माणिकराव नालट, बालमुकंदजी भिरड, प्रमोदराव देडंवे, यांचे सह समाजाचे सत्कारमूर्ती माजी अध्यक्ष मोहनराव भिरड, पुरुषोत्तमजी आवळे, रमेशजी गोतमारे, रामेश्वरजी वानखडे, संजयजी वानखडे यांची उपस्थिती होती. समाजाचे अध्यक्ष राहिलेल्या माजी अध्यक्ष यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीनी मनोगतामध्ये, समाज एकत्रीकरण, राजकीय दृष्टिकोनातून भावी वाटचाली, समाजकारणामध्ये महिलांचा सहभाग, समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून अहंकार बाजूला ठेवून समाजहिताचे कार्य करणे, आर्थिक, सामाजिक, व राजकीय दृष्टीकोन समोर ठेवणे, विविध कार्य करणे अशा प्रकारे मार्गदर्शन, मनोगत दिले.
यावेळी महिला कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यामध्ये महिला अध्यक्ष सौ. पुष्पा राजेश वानखडे, अनिता भिरड, विद्या मेहरे, रेखा नालट काचंन वानखडे, प्रियंका राठोड, दिपाली खोडे, शोभा पांडव, रेश्मा चोपडे, अर्चना सापधारे, शितल रामेकर दिपाली निवाने, शितल गोतमारे, मोनिका नायसे यांची निवड करण्यात आली, त्यांनंतर संताजी जन्मोत्सवा मध्ये पाळणे, अभंग म्हणून महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेश वानखडे, वसंत सोनटक्के, निलेश मालगे, यांनी सहकार्य केले. या प्रसंगी राजु सोनटक्के, ऑड. धंनजय वानखडे, ॲड देवाशीष काकड, प्रविण झापर्डे, संतोष अंबरते, अमर भगत, प्रशांत शेवतकर, प्रशांत चोपडे, सुनील अडचुले अरुण चोपडे, अनिल मालगे, गोपाल चोपडे, विक्की नायसे, शेषराव सांगे, निलेश खांदेल, अजय बोराखडे, पवन गमे सह बहुसंख्य समाज बांधव, भगिनी उपस्थित होते.
सुत्रसंचालन गजानन बोराळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल वानखडे सर यांनी केले.