दि. 8 रोजी धोंडराई येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार, वक्ते ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मस्के सरांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम गाथा लिहिण्याचे कार्य केले. तुकाराम गाथा म्हणजे साक्षात संत तुकाराम आहेत. संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत आणि म्हणून संताजी महाराजांनी एका अर्थाने वारकरी संप्रदायाचा कळस वाचवण्याचे महान कार्य केले असे गौरवोद्गार काढले.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यावर अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण अशी मांडणी आपल्या प्रासादिक वाणीतून त्यांनी करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. रामदास महाराज होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संतत्वाची खरी ओळख करून दिली.
प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार, वक्ते ह.भ.प. कैलास महाराज गवळी सरांनी तुकाराम गाथेतील विविधांगी पैलू सहजसुंदर शैलीतून मांडले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले संत साहित्याचे अभ्यासक प्रा. गणेश सुर्यवंशी सरांनी तुकारामांचे शिष्य म्हणून संताजी जगनाडे महाराज यांची भूमिका व महत्त्व यांची प्रभावी मांडणी केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमचे मार्गदर्शक, प्रा. राजेंद्र बरकसे सरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वक्ते महेंद्र खरात सर यांनी केले. हभप सावता महाराज साखरे यांनीही आपले मौलिक विचार यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज करपे सर यांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी संत निरंकारी मंडळाचे विष्णूपंत काकडे, भागवत जायगुडे, पत्रकार गणेश खरात, मदन काकडे, जगन्नाथ घोडके, सुरेश करपे, ज्ञानेश्वर वाघ, भगवान वाघ, बन्सीलाल खरात, राजाभाऊ गावडे सर, जगदीश हजारे सर, उमेश पाटील, युवराज राजपूत सर, शाम वखरे, भाऊसाहेब साखरे, आमच्या जि.प.मा.शाळा धोंडराई शाळेचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री परीक्षित करपे, पशुपती करपे, कृष्णा करपे, वैभव राऊत, दीपक वाघ, विकास वाघ, परमेश्वर सूळ या सर्वांनी परिश्रम घेतले.