संतांचे कार्य मानव समाजासाठी असते. थोर संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले.महाराजांची बुद्धिमत्ता फार मोठी होती. श्री संत तुकाराम महाराजांचे अभंग जतन करण्याचे कार्य संताजी महाराजांनी केले. अशा थोर संताजी जगनाडे महाराज यांचा जयंती उत्सव डवले पब्लिक स्कूल व कॉलेज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चरित्रावर प्रा. प्रकाश डवले सर यांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ मृणालिनी डवले, प्रा. प्राची घिनमिने,मुख्याध्यापिका सौ नेहा पलसोदकर, सौ सविता धनोकार, सौ ईचे मैडम प्रा. सौ कविता बलिंगे, प्रा. सौ.वैशाली निवाने, प्रा. श्वेता फाटे, प्रा. सौ पारिजात खराबे, प्रा. वररुची खेडकर, प्रा.दिपाली चिकटे, प्रा. सौ स्वाती बोरोडे, प्रा सौ रजनी पांडेय ,प्रा.सौ श्रद्धा देशपांडे ,प्रा सौ ईतिका दुबे,सागर लोखंडे, श्याम सुलताने, पवन दुबे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.