मराठ्यांच्या देणग्यावर पोसलेले वधु-वर मेळावे
वधु वर मेळाव्यांचा भव्य दिव्य पणा आता खर्या अर्थाने सुरू झाला वर्षभराची मरगळ झटकुन कामाला लागलेत व प्रचंड उत्साह, प्रचंड जिद्द, प्रचंड धडपड यातुन मेळाव्यांचे मॉल उभे रहातील. मागच्या वर्षीचे हिशोब बरेच जण देणार नाहीत. कोण सुद्धा मागणार नाहीत. लग्न जमलेले पाठ करून असतील ज्यांचे जमवायाचे आहे ती सावजे आपोआप जाळ्यात येणार. मागेल ती फी असेल तेथे मेळावा शोधुन स्वत:चया खर्चाने जाणारे वधुवर पालक अस्तीत्वात आहेत. मग मेळाव्यांना तोटा कसा होणार ? प्रत्येक वर्षाला मेळाव्यांची संख्या वाढु लागली. पुर्वी एका जिल्ह्यात एकच मेळावा असे गर्दी जमवायला किती धडपड करावी लागे हे मी प्रत्यक्ष पहात असे. काळाची गरज वधुवर मेळावा ही हाक आसे पण आज ५ ते ६ मेळावेकाही शहरात धुमधडाक्यात साजरे होतात. त्या मेळाव्या विषयी पाहू ?
मेळाव्यासाठी संस्था व त्यांची धडपड
बहुतके हा जाणीव पुर्वक शब्द वापरतो कारण मेळाव्यांची पंढरी ही पुण्यातुन सुरूवात झाली परंतु दुर्देव आसे मतभेदात ही वाट नाशीकला कधी गेली. हे पुणेकरांना समजले नाही. जेंव्हा जाणीव झाली तेंव्हा २५ डिंसेबर हे नाव कोरले गेले. या नावातून एक पलटन तयार झाली. पुण्याचे जुने होऊन नाशीकचे जे नव आहे. नाशीकचे जे चकाकत आहे ते सोने समजुन आज हाजारो मेळावे भरले जातात. या मेळाव्यांच्या व्यवसायीक करणाला मेळाव्यातील आर्थीक पणावर या मेळाव्यातील बाजारीकरणावर या मेळाव्यातील भपके बाज पणावर, या मेळाव्याच्या चांगले पणावर आसुड उगवण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन गेली १० ते १५ वर्ष लिहु लागतो काळाची गरज लिहीत होतो. आणि लिहीता लिहीता लक्षात आले समाजावर हा काळाच सोकावतो आहे या सोकवणार्या काळावर दोन हात ही सातत्याने सुरू आहेत. कारण समाजाच्या विकासा साठी, गोर गरिब समाजाचे प्रश्न सोडवण्या साठी समाजाच्या मुला मुलींच्या लग्न उरकण्यासाठी जमेल तर शासानाकडे प्रश्न सोडवण्यासाठी, संत संताजी या संस्था आकाराला आल्या. आज या समाजाच्या संस्था काय करतात ! फक्त वधु-वर मेळावे आणि सत्कार समारंभ. या त्यांच्या भव्यदिव्य पणावरच यांचे मोठे पण िसद्ध होते. यावरच समाजाचा कारभारी किती मोठा हे ठरविले जाते. ही समाजाला लागलेली किड आहे. कारण दांडगाईने मराठा ओबीसी होत असताना मी स्वत: नाशीक व इतर शहरातील मेळाव्यातील पुढार्यांना फोन केले. राणे कमिटीला तुमच्या संस्थातर्फे निवेदन द्या. पण यातील काहीनी यात रस नव्हता. हे कोणत्या सामज सेवेेचे प्रतिक आहे ! उलट महाराष्ट्र पातळीवरील तैलिकच्या प्रमुख कारभार्याने जेंव्हा सुनवले. देशमाने साहेब आता ओबीसीत दम नाही. कारण ओबीसीत दाम मिळत नाही. पदरमोड करावी लागते. दाम मिळाला की भव्यदिव्य पणा येतो. भव्यदिव्य पणात समाज हित किती साध्य झाले हा प्रश्न समाज इतका यांना ही माहित आहे. परंतु पुढार पण टिकवणे व मोठे करणेे हे वधु-वर मेळावे म्हणजे एक साधन आहे. यातुन समाज हीत साध्य होतच नाही. असे ही नाही.
मराठ्यांच्या देणग्या व वधु-वर मेळावे.
मराठा समाजाला ओबीसीत नको हे आंदोेलन रस्त्यावर असताना वधु-वर मेळाव्यातील ही भव्य दिव्य मंडळी या समाजाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नपासुन पळपुटे पणात मोठे पण समजुन शेकडो मैल दुर होते. त्यांचा पळपुटे पणा ही एक वेळ मान्य करू. पण जेंव्हा मराठा कुणबी हे प्रमाणपत्र घेऊन निवडून आलेले आसताना. यांनी काय केले आसवे तर यांनी लाखो रूपये देऊन कुणबी झाले आसताना . राखीव ओबीसी जागेवर हे जात दांडगे धनदांडगे निवडून आले आसतात. याच मंडळींनी घटनेने दिलेले आपले सर्व अधीकार पायदळी तुडवले असतात. आपला आवाज यांनी संपवलेला आसतो. आशा या झुंडशाही विरोधात समाजातील मुठभर लढत आसतात. आशा वेळी झुडशाहीचा विरोधात लढण्या पेक्षा समाजाचे तारण कर्ते व वधु वर मेळाव्यातील ही भव्यदिव्य मंडळी आशा जात दांडग्या व धनदांडग्यांच्या संपर्कात असतात. इतरापेक्षा आपला वधु-वर मेळावा भव्य करण्यासाठी लाखो रूपये घेत असतात. आशा मंडळींना प्रमुख पाहुणे वधु-वर मेळाव्यात निमंत्रीत करून त्यांना गौरवत असतात. तेंव्हा लाचारी, बोटचेपे पणा अज्ञान व मोठे पणाच्या इर्षा साठी समाजाला संपवतात का बुडवतात याचा विचार झाला पाहिजे कारण यांच्या भव्य दिव्य वधुवर मेळाव्या पेक्षा ही वस्तुस्थिती मोठी आहे. पुण्याच्या एक उपनगरातील संस्था चांगली कार्यकरते म्हणुन सुपरिचीत आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम होत आसतात. सहज परवा अतील गुपीत समजले या संस्थेला जवळ जवळ प्रत्येक कार्यक्रमाला जो हॉल जे सभागृह उपलब्ध केलेत तेच मुळात मोफत आसते. हा त्याग करणारे कोण असावेत तर असेच एक नगरसेवक की ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवुन आपले हाक्क हिरावले आहेत. आशाच एका संस्थेने गत लोकसभा निवडणूकी दरम्यान वधुवर मेळावा घेतला निम्मा खर्च कोणी करावा तर त्या परिसरातील भाजपा उमेदवारांनी. ही भव्य दिव्य माणसीकता असेल तर यांना समाजाचे पुढारी म्हणुन मानावे का ? मराठा समाजाचे आज पर्यंत अबाधीत राज्य केले ? यांना कोणत्याही पक्षाचे सोयर सुतक नाही. कोणाताही पक्ष असो काणतिही विचारसरणी असो. सत्य व असत्य याचा मागोवा नाही. फक्त पैशातून सत्ता सत्तेतुन मस्ती व मस्तीतुन गुलामगीरी लादणे ही प्रणाली आहे. या प्रणालीतुन आलेली गुलामगीरी स्विकारून आम्ही भव्यदिव्य वधुवर मेळावे साजरे करित आसु तर या देशाच्या घटनेने दिलेले अधीकार आपण माती मोल भावाने विकत आहोत. हा एक भयान भ्रष्टाचार करीत आहोत. यालाच शिष्टाचारी म्हणा नाहीतर. तुम्हाला म्हणजे माझ्या सारख्यांना दमदाटी होत असेल तर यांच्यात परिवर्तन करणे हा आमचा ही तेवढाच अधीकार आहे. कारण मराठा, ब्राह्मण यांच्या गुलामगीरीतुन, दहशतीतुन समाज भय मुक्त करणे हे ध्येय असणे हा अभिमान आहे.
मोफत मधील गुपीत मोफत असावे.
आम्ही गर्वाने नव्हे तर प्रमाणिक पणे नमुद करतो गेल्या ३३ वर्षात किमान एक कोट वधुवरांना प्रसिद्धी दिली ती सुद्धा एक रूपया न घेता. या बद्दल कुणाला शंका असेल तर आज पर्यंत सर्व रेक्राड आपण प्रत्यक्ष येऊन पाहु शकता. फक्त वर्गणीतच वधुवर मेळाव्या सारखी रंगीत पुस्तीका ती सुद्धा बांधवांना मोफत घर पोच ती सुद्धा फक्त वर्गणीदारांना दिली. या साठी आमच्या पेक्षा समाज बांधव मोठे आहेत. कारण त्यांचे सहकार्य हे महत्वाचे आहे. १० ते १२ लाख रूपये खर्च करून जे साध्य करता ते किमान एक लाखात होऊ शकते. हा अनुभव जमेस होता. म्हणुन मी या भव्य दिव्य पणातील उणीवावर टिका करीत आहे. यातुनच जळगाव येथे श्री. आर. टी. आण्णा चौधरी, सुदूंबरे येथे सुदूंबरे संस्था, कोथरूड (पुणे) येथील संस्था, चिंचवड येथील संताजी सेवा मंडळ यांनी मोफत वधु-वर मेळावा ही संकल्पना यशस्वी केली. वधु वर मेळाव्यातील बाजारीपणा काही बाबत नष्ट केला. त्या बद्दल यांचे अभिनंदन. यातूनच मोफत मेळाव्यांना चालना मिळू लागली. वधु-वर मेळाव्याची ज्याला पंढरी समजले जातेे. नाशीक मधील काही बांधवांना तुम्ही ही मोफत सुरवात करा अशी विनंती केली. तेंव्हा त्यांनी मुख्य प्रश्नाला बाजुला सारत साखरेची पेरणी करित म्हणाले. तुमचे विचार चांगले आहेत. ते पाठवुन द्या त्याला आम्ही प्रसिद्धी देऊ. ही भव्य दिव्य माणसीकता आता बदलली पाहिजे आणि ती बदलण्याची सुरूवात ही झाली आहे. आता हा मोफतचा रस्ता ही भव्य दिव्य करण्याचा काहींनी विचार राबवला आहे. म्हणून त्यांना ही काही बाबत सांगावयाचे आहे. मोफत मेळावे करतो म्हणजे वेगळे काही करतोय याची जाणीव पाहिजे. कारण यातील कष्ट आपले आहेत. यातील त्याग आपला आहे. यातील जीद्द आपली आहे. यातील त्या ग आपला आहे. याची जाणीव समजुन मनावर जरूर कोरली जाणार आहे. या मोफत साठी येणारा किमान खर्च दानशुर समाज बांधव देत आसतात कारण आपला प्रामाणीक पणा त्यांना विश्वास देत आसतो. यातून खर्च भागतो हा अनेक संस्थांचा व आमचा ३३ वर्षाचा अनुभव आहे मी मोफत वधुवर मेळाव्यातुन जावून आलो. तेंव्हा या मोफत साठी मराठा समाजाचे उंबरठे झीजवून देणग्या मिळवून जर आम्ही जात दांडग्या व धनदांडग्या समाजाला समाजाच पत, इर्षा ध्येय विकून मोफत वधुवर मेळावे घेत आसु यातुन समाजसेवेची वेगळी उंची गाठु पहात आसु पण भव्य दिव्य वधुवर मेळाव्यांच्या बाजारासारखेच आपण मोफत बुणगे मेळावे निर्माण करित राहुन. समाजाला दुसर्या मार्गाने गर्तेत घेऊन जात. आहेत. ही संकल्पना विचार, आचार कृती यातुन राबवावी.
या पेक्षा भरमसाठ फी घेणारे व्यवसायीक बरे.
ज्या समाजाचा आपण आदर्श घेतो. त्या ब्राह्मण समाजाचे भव्य दिव्य वधुवर मेळावे साजरे होत नाहीत. त्या समाजातील जाणती मंडळी आपल्या देवाच्या नावाने हाका मारतात. देव हेच त्यांचे भांडवल आसते. देवाचा धाक देवाचा आदर्श देव तुमचे भले करेल जीवनातील सुखे दु:खाला तुमच्या कर्तुत्वापेक्षा देवाची साथ फार मोठी. काहीजन देव मान्यता देऊन लुटतात काही संस्कृतीच्या नावा खाली हिंदू राष्ट्र ही गर्जना देऊन ब्राह्मण्याचा सनातनी पणा राबवतात. काहीजन वातानुकूलीत रूम मध्ये बसून शेकड्यात नव्हे तर हजारात फी लावून जगभरातील ब्राह्मण वधु वरांची माहीती पुरवत असतात त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही व्यवसाय करतो समाज सेवा नव्हे ही त्यांची रोख ठोक भुमीका आम्ही कधीच समजुन घेत नाही. काही ब्राह्मणी संस्था मुठभर राहिलेल्या गरिब ब्राह्मणासाठी सहकार्य करतात. हा विचाराचा झरा आमच्या भव्यदिव्य पणाला का स्पर्शकरू शकत नाही . कारण आज ही पुण्यासारख्या ठिकाणी सरळ सरळ व्यवसायीक मेळावा सुरू झाला आहे. याचे स्वागत करून या क्षेत्रात आसे अनेक जन का उतरत नाहीत हा या ठिकाणी प्रश्न आहे. जे उतरलेत किंवा उतरू पहात आहेत. त्यांना सोबत दिली पाहिजे. कारण या भव्य दिव्य पणासाठी किमान महाराष्ट्रात ५ ते ६ कोट रूपये दरवर्षी खर्च होतात. हा पैसा समाज विकासाला खर्च झाला तर समाज बलवान होईल आणि भव्यदिव्य पणातल्या नेत्यांना इतर समाजाच्या आडचणी सोडविण्यास संधी मिळेल.
दिनांक 21-10-2014 00:29:15