श्री संताजी जगनाड़े महाराज हे,
संत तुकाराम महाराज यांचे शिष्य होते
असा भ्रामक व खोटा प्रचार ब्राह्मणवाद्यान कडून केला जातो
कोणीही वारकरी संत स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्याला आपल्या पेक्षा छोटा समजत नसे
वस्तुतः सर्वच संत हे एकमेकांना
भाऊ - गुरुभाई मानत असे
हे सर्व संत फक्त विठ्ठलालाच
आपले गुरु/दैवत मानीत असत
खालील अभंगा वरून हे स्पष्ट होते ।
..
एकादशी दिनी संतु तुका वाणी ।
राऊळा आंगणी उभे होते ।।
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना ।
पांडुरंग चरणा नमियेले ।।
.
तेथुनी तो आला तुका जेथे होता ।
अलिँगन देता झाला त्याशी ।।
तुका म्हणे संतु पुसतो तुजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।
.
तुजशी ते ब्रम्हज्ञान कांही आहे ।
किंवा भक्तिमाय वसे पोटी ।।
काय तुझ्या मागे, कोण तुज सांगे ।
काय ते अभंग जाणितले ।।
.
(अर्थ:- संत तुकाराम विचरतात = "हे संताजी इतके चांगले-नवनवे अभंग तुम्हाला कुठून सुचतात, हया मागे काय शक्ति-रहस्य दडलेले, ते मला सांगा")
.
घाणाची घेऊनी बैसलासि बुधा ।
(बुधा=बौद्ध/बुद्धिमान/ज्ञानी)
जन्म पाठिमागा का गेला ।।
तुका म्हणे सर्व सांग तु मजला ।
सांगतो तुजला संतु म्हणे ।।
.
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही ।
आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी ।
पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।।
.
संतु म्हणे ब्रम्ह ब्रम्हा सर्व जाणे ।
आपुले ते मन सुधारले ।।