काटोलमध्ये ७५० जणांची आरोग्य तपासणी
काटोल : संत जगनाडे महाराज जयंतीचे औचित्य साधून स्थानिक संताजी उत्सव समितीच्या वतीने जगनाडे महाराज मंदिरात भागवत सप्ताह तसेच आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिरात ७५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात डॉ. रितेश नवघरे, डॉ. प्रिया नवघरे, डॉ. निवेदिता कामडी, डॉ. सचिन जिभकाटे, डॉ. सारांश बारई, डॉ. अंकित भांगे, डॉ. निखिल चरडे, डॉ. ललित निर्वान, डॉ. चेतन रेवतकर, डॉ. मोहन शेंद्रे, डॉ. परिचिता रेवतकर, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. अजिंक्य भस्मे, डॉ. पल्लवी देशमुख, डॉ. किशोर ढोबळे, डॉ. लतेश जोगेकर, डॉ. नेहा जोगेकर, डॉ. अश्विनी जोगेकर, डॉ. पूजा उमाठे, डॉ. प्राजली चरडे, डॉ. अंकित रेवतकर, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. स्मिता वाघमारे, डॉ. देवेंद्र बारई, डॉ. मीनाक्षी बारई, डॉ. गौरव शेंडे, डॉ. मनोहर कळंबे, मालिनी कळंबे, पूनम बगवे, अनिल वैद्य आदींनी सेवा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चेतन रेवतकर यांनी केले. संचालन डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. समशिकाना रेवतकर, डॉ. नेहा जोगेकर यांनी केले. डॉ. देवेंद्र बाराई यांनी आभार मानले.