८ डिसेंबर रोजी संत भगवद भक्त शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती देऊळगाव राजे येथील तेली समाज यांनी मतिमंद मुलांच्या शाळेत साजरी केली. समस्त तेली समाज देऊळगाव राजे व तेली समाज दौंड उपस्थित होते. आर्वी फाट्या जवळ निवासी मतिमंद मुलांची कृषी प्रशिक्षण कार्यशाळा मुक बधीर आश्रम शाळा आहे. तेथे ४० ते ४५ विशेष आणि दिव्यांग मुले आहेत त्यांना खाऊ वाटप चे नियोजन करण्यात आले होते, तसेच संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा पूजन व जगनाडे महाराजांचे प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी देऊळगाव राजे येथील तेली समाज पदाधिकारी तसेच दौंड तालुका अध्यक्ष महेश देशमाने दौंड शहर अध्यक्ष उल्हास पवार, उत्सव अध्यक्ष अजय क्षीरसागर, पांडुरंग देशमाने, श्रेयस देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन देऊळगाव राजे येथील तेली देशमाने, अध्यक्ष अजित भिसे, उपाध्यक्ष श्रीराम भुरे, खजिनदार पोपट भिसे, गोरख देशमाने, ज्ञानेश्वर इप्ते इत्यादी तेली समाज बांधवांनी केले.