चांदवड शहरात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. प्रारंभी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ समाजबांधव जगन्नाथ राऊत, अध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष गणेश वाघ यांच्या हस्ते करण्यात येऊन संताजी महाराजांच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी महिलांनी रथाचे पूजन केले. यावेळी संताजी महाराज यांच्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.
संताजी महिला मंडळाने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाच्या साड्या व लाल रंगाचे फेटे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीच्या सांगते नंतर महिला मंडळ अध्यक्ष अनिता खैरनार व सचिन खैरनार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानिमित्त सकाळी संताजी महिला मंडळाच्या वतीने दगडी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक महाले यांनी केले तर दीपक व्यवहारे यांनी आभार मानले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अशोक काका व्यवहारे, दत्तात्रय राऊत, सचिन खैरनार, रामदास शिरसाठ, तालुकाध्यक्ष दत्तात्रय साळुंके, भिकाशेठ व्यवहारे, बद्रीशेठ जाधव, दत्तू सोनवणे, पिंटू राऊत, सूर्यकांत ठाकरे, प्रकाश सोनवणे, सतीश वाघ, पंकज राऊत, सागर सुर्यवंशी, राजू बिरार, संताजी महिला मंडळ अध्यक्ष अनिता खैरनार, उपाध्यक्ष बेबीताई साळुंखे, उपाध्यक्ष गायत्री बोरसे, खजिनदार योगिता सोनवणे, पुष्पा बिरार आदींसह संताजी महिला मंडळ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.