इंदिरानगर - येथील कलानगर परिसरातील संताजी समाजमंदिरात संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांची ३९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संत शिरोमणी श्री संताजी महाराजांच्या मूर्तीचे इंदिरानगर तेली समाजाचे अध्यक्ष मनोज कर्पे यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. त्यानंतर अभिषेक व आरती झाली. यावेळी मान्यवरांनी मूर्तीस पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण केले. कार्यक्रमाला इंदिरानगर तेली समाजाचे उपाध्यक्ष धीरज वालझाडे, सचिन दिवटे, सुभाष वाघचौरे, नीलेश चौधरी, प्रकाश चिंचोलकर, रायजादे, रवींद्र महाले, जयेश आमले, सागर चोथे पाटील, संजय सोनवणे, धनंजय अबोले, विलास गायकवाड, ओंकार देवरगावकर, गणेश करपे, सोनाली कुलकर्णी शिरसाठ, हेमंत शिरसाट, राजु कर्पे, कांतीलाल शिरसाट आदींसह तेली समाजबांधव उपस्थित होते.