चंद्रपूर तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवार दि. ८ जानेवारी २०२२ ला सकाळी ११:०० वाजता मातोश्री सभागृह खनके वाडी ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे भव्य उपवधू उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
समाजातील गरीब व होतकरू मुला-मुलींना योग्य स्थळ शोधण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. उपवर उपवधू च्या पालकांना योग्य स्थळ शोधण्यासाठी समाजातील युवक युवतीची संपूर्ण माहिती असलेली संपुर्ण नाव, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, उंची, वर्ण, व्यवसाय व नोकरी इत्यादी माहिती असलेली 'प्रेरणा २२' या पुस्तिकेचे अनावरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात येणार आहे. समाजातील जास्तीत जास्त वधू वरानी आणि आपले नाव नोंदणी सूर्यकांत खनके मातोश्री सभागृह, खनके वाडी, तूकुम चंद्रपूर, शेखर वाढई लोकसेवा मुद्रणालय कस्तुरबा रोड चंद्रपूर, मनोज झाडे जोड देऊळ, पठाणपुरा वार्ड चंद्रपूर, सुनील बुटले शिव शंकर अपार्टमेंट तुकूम, चंद्रपूर, कैलास राहटे दीप अपार्टमेंट, शिवाजीनगर चंद्रपूर, पुंडलिक रागीट महलक्ष्मि प्रोविजंस आंबेडकर चौक राजुरा, इटनकर विसापूर, संजय पडोळे गांधी चौक मुल, विक्रम येरणे, येरणे किराना स्टोर्स गडचांदूर, चंदा वैरागडे बाबूपेठ चंद्रपूर येथे नोंदवावी असे मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुर्यकांत खनके यांनी कळविले आहे.