शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजपा.चे प्रदेश उपाध्यक्ष श्री बबन रावजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्ष कैलास आधार चौधरी , सचिव रवींद्र जयराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करण्यात येत आहे. त्याचे कुटुंब परिचय फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली असून शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील तेली समाजाच्या सर्व समाजसेवक बंधूंनी आपल्या कुटुंबातील परिचयाचे संपूर्ण परिचय फॉर्म भरून तयार करून आज मंडळाचे उपाध्यक्ष किशोर देविदास चौधरी यांच्याकडे सुपूर्द केलेत तसेच टेकवाडे येथील देखील सर्व फॉर्म भरून तयार झालेले असून तेथील फॉर्म गोपाल चौधरी यांच्याकडे जमा झालेले आहेत. शिरपूर शहरात देखील समाजाचे राऊत ( न्हावी ) यांचे मार्फत प्रत्येक घरी फॉर्म वितरण केलेले असून शिरपूर शहरातील समाजसेवक बांधव देखील आपल्या कुटुंबाचा संपूर्ण परिचय फार्म भरून पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करीत असून संपूर्ण तालुक्यात मंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.
संपूर्ण तालुक्यामध्ये खान्देश तेली समाज मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील शिरपूर शहरासह वाघाडी, टेकवाडे,थाळनेर होळनांथे, भाटपुरा आदि ठिकाणी फॉर्मचे वितरण झाले असून सर्व ठिकाणी तेली समाज बांधव परिचय फार्म भरून देत मंडळाच्या या सामाजिक उपक्रमास हातभार लावत आहेत. लवकरच सर्व फॉर्म भरून तयार झाले नंतर लवकरच सुबक व आकर्षक अशी जनगणना परिचय पुस्तिका तयार करून तिचे एका खास समारंभात प्रकाशन करण्यात येईल असे खान्देश तेली समाज मंडळाचे शिरपूर तालुका अध्यक्ष दिनेश अशोक चौधरी, उपाध्यक्ष किशोर देविदास चौधरी, सचिव राकेश सुरेश चौधरी, गोपाल चौधरी, कैलास चौधरी, मयूर चौधरी, प्रकाश चौधरी, किशोर चौधरी, आकाश चौधरी, निखिल चौधरी, संदीप चौधरी यांनी कळविले आहे.
शिरपूर तालुक्यातील अजून ज्या समाज बांधवांपर्यंत फॉर्म पोहोचले नसतील त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क करून आपला फार्म भरून द्यायचा आहे व सर्वांनी सहकार्य करायचे आहे. जेणेकरून संपूर्ण तालुक्यातील होणाऱ्या या खाणेसुमारीत तेली समाज बांधवांचे एकही कुटुंबाचा परिचय सुटणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे देखील मंडळांने आवाहन केलेले आहे. खान्देश तेली समाज मंडळाच्या या उपक्रमास शिरपूर शहर तेली समाजाचे संपूर्ण सहकार्य मिळत असून समाजातील सर्व संस्था व सामाजिक कार्यकर्ते या उपक्रमास हातभार लावत आहेत असे मंडळांने कळवले आहे.