जानेफळ - मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू द्या. कारण मुलगी शिकली तर दोन्ही घरांचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप डोमळे यांनी येथे केले.
संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जानेफळ येथे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. डोमळे बोलत होते.
गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भजनी मंडळासह तेली समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दरम्यान भजन - कीर्तनासह पावली - फुगडी यासारखे नृत्य सादर करण्यात आले. या मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाखरे होते. प्रमुख अतिथी मेहकर येथील डॉ. दिगंबर वराडे, संताजी कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक विशाल डोंगरे, प्रा. दिलीप डोमळे, सुरेश वडणकर, संतोष तोंडे, भानुदास सराफ, दिलीप डोमले महादेव पाखरे, उपसरपंच गणेश पाखरे, सुधाकर लोखंडे, गजानन तोंडे, प्रभाकर लोखंडे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संताजी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दहावी व बारावीत ७५ टक्क्यांवर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पत्रकार दिलीप डोमळे, राजू केदारे, सचिन वाळके, विजय केदारे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. दिगंबर वन्हाडे यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड असेल ते क्षेत्र निवडावे, असा सल्ला दिला. विशाल डोगरे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. विष्णुपंत पाखरे यांनी समाजात एकीची भावना जोपासत कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे आभार व्यक्त केले. प्रास्ताविक ज्योती केदारे यांनी केले. सूत्रसंचालन राजू केदारे यांनी केले. श्याम वाळके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष गजानन वाडेकर, सोपान लोखंडे, गजानन पाखरे, मधुकर सराफ, अमोल पाचपवार, सतीश नाके, राहुल डोमळे, गौरव क्षीरसागर, नागेश महाकाळ, गोपाळ खरात, नीरज तोंडे, नीलेश वानखेडे, गोपाल व्यवहारे, वैभव सराफ, गजानन करवंदे, वैभव पाखरे, श्याम भोलाने, राम वाळके, अजिस मामू यांनी पुढाकार घेतला.