सोनगीर : शिरपूर (जि. धुळे) येथे तेली समाजाचे विविधोपयोगी मंगल कार्यालय उभे राहणार असून समाजधुरिणांकडून जागेची पाहणी झाली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते फलक अनावरण झाले. शिरपूर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. अशा शहरात तेली समाजाचे मंगल कार्यालय असावे अशी समाजाची इच्छा होती. त्यानुसार वरझडी रोड, शिरपूर भागात जागा घेण्यात आली. त्या जागेवर नियोजित तेली समाज मंगल कार्यालय फलकाचे अनावरण झाले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade