दिनांक 28/1/2023 ला जवाहर विध्यार्थी गृह, संत्रा नगरी व मेट्रो सिटी नागपूर येथे आयोजित करण्यात आले. विविध वयोगटाच्या मुली व महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सौ. पूजा कांबळे यांनी साकारलेली श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची हुबेहू रांगोळीने विशेष लक्ष वेधले, कार्यक्रमात नृत्य, लावणी , पोवाडे, उखाणे, गाणे, गेम्स व अन्य आयोजनामुळे महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व सहभागसुद्धा घेतला . 50 च्या वर महिलांनी सभासद होण्यास फॉर्म भरले. साकोली, काटोल, चंद्रपूर,बेसा, कामठी व एमपी मधून सुद्धा महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वात तरुण 78 वर्षाच्या समाजसेविका व उत्कृष्ट वक्ता अशा मा. सौ. सुशीलाबाई लांजेवार यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शक, प्रेरणास्थान व समाज उत्थनाकरीता आपलं आयुष्य समर्पित केले असे आमचे मा. श्री रमेशजी गिरडे, अध्यक्ष जवाहर विद्यार्थी गृह, आमच्या सर्वांचे लाडके एका हांक वर समाज बांधवांसाठी धावून जाणारे असे मा. श्री. अजयजी धोपटे संस्थापक- संताजी ब्रिगेड महासभा, अन्याय ज्यांना सहन नाही व एक कणखर व्यक्तिमत्व मा. श्री. लोकनाथजी भुरे विदर्भ अध्यक्ष संताजी ब्रिगेड त्यांनी स्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून *मा. श्रीमती प्रतिभाताई खोब्रागडे, मा. सौं. सुरेखा थोते, मा. श्रीमती कुसुमताई बावनकर , मा. सौं. प्रतिभाताई कुंभलकर , नगर अध्यक्षा पारशिवनी, मा. सौं. करुणाताई आष्टणकर नगर अध्यक्षा कन्हान, मंचावर उपस्थित होते. मा.डॉ.सौ. शिल्पा मुंगले यांनी स्त्रियांनी तब्येतीची काळजी कशी घ्यावी यावर खूप मोलाचे मार्गदर्शन केले. गिरडेकाकांनी कार्यक्रमाचे खुप कौतुक केले आणि असंच समाजाच्या महिला आणि संताजी ब्रिगेड महासभा संस्था उन्नती करत राहो अशा शब्दात सदिच्छा दिल्या.
कु. रुद्र सचिन घाटोडेला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल विशेष ट्रॉफी देऊन व पी.एच.डी सम्मानित सौ. लक्ष्मी वानोडे यांना माननीय श्री अजय भाऊ धोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमचे प्रास्ताविक - सौ. कविताताई रेवतकर सूत्रसंचालन - सौ. चित्रा माकडे सहसंचालन - डॉ.सौ.दीपा हटवार सांस्कृतिक संचालन - सौ.सोनल बावनकुळे आभार प्रदर्शन- सौ.मंजुषा चकोले ज्यांच्या सक्रिय सहभागा शिवाय इतका सुंदर कार्यक्रम घडला नसता असे आमचे खालील पदाधिकारी सौ.सोनाली टिकले सौ.नर्मदा तडस सौ.प्रणोती मानपुरे सौ.लता बावणकर सौ.रजनी वैरागडे सौ.प्रणिता वैरागडे सौ. वनिता सावरकर सौ,कमल घोडमारे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पद नियुक्तीच्या कार्यक्रमाकरिता श्री हितेशजी बावनकुळे सह सचिव महाराष्ट्र प्रदेश,श्री नंदू भाऊ धोपटे सदस्य म.प्र., श्री गजाननजी तळवेकर संघटक प्रमुख म.प्र. व श्री मंगेशजी साखरकर सह संघटक प्रमुख म.प्र., श्री चंदू वैद्य ना.श.सं.प्र, श्री सुनिल मानपुरे उपाध्यक्ष ना.श., श्री राजेश हटवार, *श्री,महादेव घोडमारे,उपाध्यक्ष नागपूर शहर, श्री. अजयजी कांबळे मीडिया/सोसिअल मीडिया प्रमुख यांनी विशेष उपस्थिती नोंदवली. वाण व हळदीकुंकू चा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व महिलांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला.