७४ वा प्रजासत्ताक दिन व अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन उत्‍सात संपन्‍न.

     २६ जानेवारी २०२३ आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन व आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान जपलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या आपल्या समाज संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन, यानिमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्‍या गेल्‍या.

74th Republic Day and 2nd Anniversary of Ahmednagar District Teli Samaj Mahasabha celebrated     दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात कार्यास प्रत्यक्ष पणे भेट देऊन सुरुवात केली आज शेवगाव तालुका, शहर येथे कु.शुभदाताई रामेश्वर सोनवणे यांची अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष (युवती आघाडी) यापदी जेष्ठ मार्गदर्शक मा श्री यशवंतराव वाघचौरे, मा श्री सुधाकर काका बनसोडे, मा श्री बद्रीनाथ लोखंडे (जिल्हा निरीक्षक), मा श्री श्यामराव वालझाडे, मा श्री अॅड. विक्रांत वाघचौरे  (जिल्हा अध्यक्ष अ.नगर जिल्हा), मा सौ तारकेश्वरी ताई वालझाडे (महिला जिल्हा निरीक्षक) , श्री सुरेशभाऊ पन्हाळे, श्री माऊली कुर्हे, श्री सोमनाथ सोनवणे शेवगाव शहर अध्यक्ष , सौ सोनवणे ताई, सौ रोहिणी ताई लोखंडे, कु गायत्री लोखंडे, आदी समाज पदाधिकारी  उपस्थित होते ,

     यावेळी श्री अशोक लोखंडे साहेब, श्री अतुल भाऊ रणखांब, श्री क्षीरसागर साहेब , कु सोनवणे ताई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व शॉल देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी श्री बद्रीनाथ लोखंडे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात युवतींना अश्या प्रकारे जबाबदारी देऊन समाज कार्यात सहभागी करण्याची ही पहिलीच वेळ, तेली समाजाचे इतिहासात पहिल्यांदाच अशी निवड आपल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या माध्यमातून केली आहे याची दखल संपूर्ण देशात घेतली जाईल व युवतींना यापुढे समाजात अनेक संघटना सहभागी करून घेतील व त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्य करण्यास युवतींना संधी मिळेल.

    अहमदनगर जिल्हा तेली समाज प्रत्येक वेळी समाजाला काही तरी नवीन संकल्पना देत असतो आणि यावर्षी वर्धापनदिनाच्या प्रसंगी युवतींना एवढी मोठी आणि महत्त्वपूर्ण संधी देऊन कु शुभदा ताईंच्या माध्यमातून समाजाची पहिली युवती जिल्हाध्यक्ष मिळाली आहे , ताईंच्या आई आणि वडिलांचे करावे तेवढे कौतुक आणि म्हणावे तितके आभार कमी आहे, आपल्या मुलीस समाज कार्यास प्रोत्साहन देऊन समाजा प्रती असलेले ऋण फेडण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि निस्वार्थ, चांगले व स्वच्छ समाज कार्य करणाऱ्या टीमवर केलेल्या कार्याचा गौरव वाढावा असा विश्वास ठेवला आहे तसेच या नियुक्ती च्या माध्यमातून युवतीमध्ये जनजागृती , लवजीहाद, आरोग्य विषयक, तंटा मुक्ती, शैक्षणिक उपक्रम याविषयावर कार्य करण्यास संधी मिळेल असे मत जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी मांडले

दिनांक 03-02-2023 21:23:16
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in