अहमदनगर जिल्ह्याचा स्वाभिमान जपणारी एकमेव संस्था अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुका व शहर येथे कु. शुभदाताई रामेश्वर सोनवणे यांची निवड अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष (युवती आघाडी) यापदी केली व महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम युवती आघाडीची स्थापना करून प्रथम जिल्हाध्यक्ष पदी निवड केली
यावेळी श्री प्रकाश लोखंडे साहेब माजी पोलीस निरीक्षक, सौ तारकेश्वरी ताई वालझाडे,(जिल्हा निरीक्षक महिला आघाडी) श्री बद्रीनाथ लोखंडे,(जिल्हा निरीक्षक) श्री अॅड.विक्रांत वाघचौरे (जिल्हाध्यक्ष,अ.नगर जिल्हा) श्री अतुल भाऊ रणखांब, श्री सुधाकर काका बनसोडे, श्री यशवंतराव वाघचौरे, सौ रोहिणी ताई लोखंडे, श्री रामेश्वर सोनवणे सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व शॉल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री बद्रीनाथ लोखंडे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात युवतींना अश्या प्रकारे जबाबदारी देऊन समाज कार्यात सहभागी करण्याची ही पहिलीच वेळ , तेली समाजाचे इतिहासात पहिल्यांदाच अशी निवड आपल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या माध्यमातून केली आहे याची दखल संपूर्ण देशात घेतली जाईल व युवतींना यापुढे समाजात अनेक संघटना सहभागी करून घेतील व त्यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्य करण्यास युवतींना संधी मिळेल.
अहमदनगर जिल्हा तेली समाज प्रत्येक वेळी समाजाला काही तरी नवीन संकल्पना देत असतो आणि यावर्षी वर्धापनदिनाच्या प्रसंगी युवतींना एवढी मोठी आणि महत्त्वपूर्ण संधी देऊन कु शुभदा ताईंच्या माध्यमातून समाजाची पहिली युवती जिल्हाध्यक्ष मिळाली आहे , ताईंच्या आई आणि वडिलांचे करावे तेवढे कौतुक आणि म्हणावे तितके आभार कमी आहे, आपल्या मुलीस समाज कार्यास प्रोत्साहन देऊन समाजा प्रती असलेले ऋण फेडण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि निस्वार्थ, चांगले व स्वच्छ समाज कार्य करणाऱ्या टीमवर केलेल्या कार्याचा गौरव वाढावा असा विश्वास ठेवला आहे तसेच या नियुक्ती च्या माध्यमातून युवतीमध्ये जनजागृती, लवजीहाद, आरोग्य विषयक, तंटा मुक्ती, शैक्षणिक उपक्रम याविषयावर कार्य करण्यास संधी मिळेल असे मत जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे यांनी मांडले.