लातूर जिल्हा तेली समाज सेवाभावी संस्था व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, लातूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा तेली समाज जनगनणा - २०२३ पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय तेली समाज व वधु-वर पालक परिचय मेळावा, लातूर - २०२३ रविवार, दि. ०५/०३/२०२३ सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ : शाम मंगल कार्यालय, सावेवाडी, लहाने हॉस्पिटल शेजारी,
लातूर शहरात रविवार दि. ०५/०३/२०२३ रोजी तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील विवाह इच्छुक वधु-वरांचे विवाह सुलभतेने जुळावेत व स्थळासंबंधी सर्वांना माहिती व्हावी हा मेळाव्या मागचा उद्देश आहे. पालकांनी आपल्या घरातील, नात्यातील परिचयातील वधु-वरांच्या २ पासपोर्ट फोटो, बायोडाटा नोंदणी करून सहकार्य करावे. नोंदणीसाठी आपण आग्रहपुर्वक प्रयत्न करावेत.
टीप : आपली नाव नोंदणी निःशुल्क आहे. तरी खाली दिलेल्या व्हॉटसप नंबरवर आपले २ फोटो व बायोडाटा पाठवावेत. श्री विश्वनाथ मनोहर खडके मो.9423347413 श्री शिवशंकर वैजनाथ क्षीरसागर मो.8999858576