दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती
असे ज्यांना भेटताक्षणी म्हणावेसे वाटत होते, अशा दिव्यमूर्ती, प्रेममूर्ती, करुणा मूर्ती, स्व. श्रद्धेय आदरणीय आदर्श माता पर्वताआईची समर्पित जीवन यात्रेची सांगता गेल्या ३१ जानेवारी २०२३ या दिवशी निसर्ग नियमाप्रमाणे, वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी झाली. पर्वताआईच्या दुःखद निधनाने आदरणीय श्री. के.डी आबा चौधरी, श्रीमती सुभद्राताई आणि त्यांच्या समस्त सोनवणे परिवाराचे मातृछत्र, कृपाछत्र हरपले सोनवणे परिवारातील एक सुवर्ण पान गळून पडले.
पर्वताआई अत्यंत हुशार, सुस्वभावी, स्वावलंबी, काटक, कष्टाळू आणि सय्यमी, संसारदक्ष असल्यामुळे त्यांनी डूमन बाबांच्या प्रपंचाची बाजू उत्कृष्ठपणे सांभाळली गांधीवादी विचारांनी भारावलेले आपले पती डूमन बाबांना त्यांनी सर्व प्रकारे व सर्वार्थाने घट्ट अतुतू साथ दिली देशसेवा आणि समाज सेवेच्या त्या के.डी आबा व डूमन बाबांच्या प्रेरणा स्त्रोत होत्या त्यांनी डूमन बाबांच्या देश सेवेच्या कार्यात स्वतः ला झोकून दिले होते. १९४२ च्या स्वातंत्र्य लढया नंतर १९४७ ते १९९३ पर्यंत बाबांच्या खाद्या ला खांदा लावून खंबीर पणे उभ्या राहून त्यांच्या संसारात अन सर्व कार्यात रमल्या पत्नी धर्माचा खरा अर्थ त्यांनी आपल्या संसारात दाखवून दिला. पार्वती आई मातृत्व, कर्तुत्व, दातृत्व आणि संस्कारांची खाण होती. संस्कारांची कस्तुरी, माया ममतेची तिजोरी आणि प्रेमाची गंगोत्री होती. तिच्या प्रेमाला अंत नाही, तिच्या उंचीचा दुसरा संत नाही. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत कष्ट सुखाने सहन करून के.डी आबांना हे विश्व, हि दुनीयादारी दाखविनारी पर्वता आई खरोखरच "आदर्श मातृशक्ती" होती. त्यागाचे, कष्टाचे, संकटाचा पहाड फोडणे संस्कार देवून तिने जीवन कसे जगावे आबांना शिकविले, तीचे पाय मातीचे होते तरी तिच्या पायी सर्व तीर्थ गोळा झालेली होती. पार्वती आई पवित्र मूर्ती असल्यानेच वंदनीय, पूजनीय स्मरणीय आणि आचरणीय अनुकरणीय, आहे.
आबांच्या सामाजिक कार्यात पार्वता आईचा सहभाग मेरू पर्वतासारखा अढळ राहिला. ' सेवा परमो धर्म हा उदात्त हेतू काय असतो हे त्यांनी आपल्या कार्तुत्वातून दाखवून दिला पार्वता आई शतायुषी व्हावेत अशीच आबांची व प्रत्येकाची मनोमन ईच्छा होती. परंतु ते घडले नाही. त्याच जगन सर्वांसाठी आदर्श होत. आणि आता त्याचं नसन हे क्लेशदायक असणार आहे. परंतु त्या दुःखाला सर्वांना स्वीकारावेच लागेल संत श्री. संताजी महाराज त्यांच्या विचार कार्याला आसमंतामध्ये सदैव तेवत ठेवो हीच प्रत्येक संताजी भक्तांची आंतरिक ईच्छा आहे. वात्सल्याची, माया ममतेची पार्वताआई हि दिव्यमूर्ती आठवणींच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयात अमर आहेत. हे मात्र नक्की !
टी. एम. चौधरी निवृत्त मुख्याध्यापक प्र.वि.मंदिर चोपडा