श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत लवकरच श्री साईबाबा सेवा संस्थान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, शिर्डी ग्रामस्थ, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व सर्वांच्या सहभागातून होणार आहे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2023 वर्ष 2 रे ज्या प्रमाणे आपण श्री साईलीला पालखी सोहळा समिती स्थापन करून आपला पालखी सोहळा गेल्या 20 वर्षांपासून यशस्वी करत आहोत त्याच प्रमाणे या वर्षी पासून सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन सर्व गावकऱ्यांना सहभागी करून , एकत्रित करून सर्व घटकांना सर्व समाजांना मानाचे स्थान देऊन शिर्डीतील पहिला असा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करत आहोत जो सार्वजनिक उत्सव साजरा करण्याप्रमाणे आहे.
जबाबदारी मोठी आहे आप आपल्या समाजातील गरजवंत, आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या घटकांना या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून उभारी देऊ शकतो, अनाथांचा नाथ श्री साईनाथ आणि आपण त्याचे अनुयायी आहोत आपले आपल्या समाजाप्रति कर्तव्य आहेत ती आपण यामाध्यमातून पार पाडू, कन्यादान व अन्नदान यासारखे पुण्य नाही तर यासारखी दुसरी सामाजिक बांधिलकी सुद्धा नाही या सर्व पवित्र कार्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन येत्या 21 मे 2023 शिर्डी येथे संपन्न होणाऱ्या आपल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने सहभाग घ्यावी ही विनंती करण्यात आलेली आहे.
आपला नम्र -
अॅड. विक्रांत सि वाघचौरे,
सदस्य सामुदायिक विवाह सोहळा समिती शिर्ड, संस्थापक अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा शिर्डी शहर, जिल्हाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा तेली समाज, राष्ट्रीय महासचिव, नमो नमो मोर्चा भारत.