अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे शिलेदार राहता तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सदैव स्मरणात राहील असे समाज कार्याचा महामेरू आदरणीय कै. बाबुरावजी साळुंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज याअंतर्गत राहता तालुका तेली समाजाची प्राथमिक बैठक रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बैठकीचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अॅड श्री.नंदकुमार साळुंखे (रुई) व श्री सुधाकर काका बनसोडे, (लोणी) तर प्रमुख उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक श्री विलासराव भाऊ दुर्गुडे (पुणतांबा), श्री यशवंतराव काका वाघचौरे (शिर्डी), श्री अवधुत काका महाले ( राहता ), श्री चंद्रकांत काका साळुंखे, (रुई), श्री सुरेशरावजी नागले, जिल्हा उपाध्यक्ष ( राहता ), श्री मुकुंदराव बनसोडे ( लोणी ) तर मिटिंगसाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री रेवणनाथजी काळे ( कोल्हार ), श्री शशिकांत भाऊ महाले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ( शिर्डी), श्री दिपकराव चौधरी , शिर्डी शहर अध्यक्ष ( शिर्डी ) श्री अनिल भाऊ चौधरी (शिर्डी), श्री गणेश भाऊ थोरात, (कोऱ्हाळे), श्री गणेश भाऊ वाघचौरे ( शिर्डी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली सौ.वैशाली ताई देशमाने अध्यक्षा राहता तालुका (कोल्हार) सौ.रोहिणी ताई लोखंडे,सदस्या अहमदनगर जिल्हा ( शिर्डी ) , सौ.आशाताई राऊत सदस्य राहता तालुका ( शिर्डी ), सौ.भारती ताई जंजाळ, सदस्य राहता तालुका (रुई), सौ.कावेरी ताई मचाले सदस्य राहता तालुका ( रुई ), यांच्या विशेष उपस्थितीत तसेच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. अॅड विक्रांत वाघचौरे, (शिर्डी) श्री.राजेशजी लुटे ,जिल्हाध्यक्ष युवक आघाडी ( साकुरी ) , श्री बद्रीनाथ लोखंडे जिल्हा निरीक्षक , (शिर्डी) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुकाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी आराध्यदैवत संतश्रेष्ठ संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयघोष करून सुरुवात झाली. यावेळी मिटिंगचे विषय वाचन करण्यात आले त्यात प्रामुख्याने मांडण्यात आलेले विषय पुढील प्रमाणे ठराव करून संमत करण्यात आले,
★ ८ मार्च महिला दिन निमित्ताने तालुक्यात विविध ठिकाणी, विविध कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन,
★ तालुका निहाय परिसंवाद यात्रा आयोजन व नियोजन,
★ सामुदायिक विवाह सोहळा आयोजन व नियोजन,
★ आपला जिल्हाध्यक्ष आपल्या दारी उपक्रम ज्यात विविध नवीन संकल्पना मांडून त्यानुसार नोंदणी करणे
★ व इतर ऐन वेळेचे विषय यावर चर्चा करण्यात आली
याप्रसंगी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना मा सौ वैशाली ताई देशमाने यांनी सांगितले की, राहता तालुका तेली समाजाच्या वतीने महिलांनी सामाजिक सांस्कृतिक उपक्रमात आपला सहभाग वाढवावा व तसेच तेली समाजातील इतर महिलांनाही आपल्या सोबत घेऊन समाजोपयोगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे आणि महिलांचे संघटन वाढवून महिला सशक्तीकरण करून महिलांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी उपक्रम येत्या महिन्यात महिला दिनानिमित्त संपूर्ण तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे याची माहिती दिली
अ. नगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांनी समाज एकसंघ आणि संघटित करून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणले असून समाज उपयोगी उपक्रम व राज्यस्तरीय मेळावे आयोजित करून अहमदनगर जिल्हा व राहता तालुका तेली समाजाचे उज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले,
शिर्डी येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी झालेला यशस्वी वधुवर पालक परिचय मेळाव्यात दोन महिन्यांत चार लग्न जमले गेले. त्याचे सर्व श्रेय तालुक्यातील समाज बांधवांना आहे त्याचाही उल्लेख बैठकीत घेण्यात आला याचेही विशेष दखल घेण्यात आली, सर्व उपस्थित प्रमुख मान्यवर व समाज बांधव यांचे आभार श्री बद्रीनाथ लोखंडे यांनी मानले
यावेळी श्री गोरख भाऊ लुटे ( रांजणगाव ) , श्री भुपेंद्र मचाले (शिर्डी), श्री रामेश्वर क्षिरसागर ( शिर्डी ) श्री प्रसाद भाऊ महाले (राहता) , श्री महेश जंजाळ (रुई) आदी समाज यांच्या विशेष उपस्थितीत राहता तालुका तेली समाजाची बैठक आनंदाच्या खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.