देवळी (जि. वर्धा) - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य कार्यकारणी, विभाग, जिल्हा, सर्व आघाडी पदाधिकारी यांची रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी देवळी (जि.वर्धा) येथे राज्य कार्यकारिणी सभा आयोजित करण्यात आली आहे. खासदार व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री रामदासजी तडससाहेब यांचे आदेशानुसार आपणास सूचित करण्यात येते की, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्य कार्यकारिणी सभा देवळी - वर्धा येथे रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २३ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० (सकाळी ९.०० ते १०.०० चहा-नाश्ता, सकाळी १२.०० ते १.०० जेवण व दुपारी १.०० ते ५.०० कार्यकारिणी मिटींग) वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. सदर मिटींगमधे विभाग,जिल्हा व तालुकास्तरावरील नेमणुकांचा व संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. तरी सर्व राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, सेवा- महिला युवा आघाडीस्तरीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी १२ फेब्रुवारी २३ करिता देवळी (रेल्वे स्टेशन वर्धा) येथे येण्याचे नियोजन (रेल्वे, बस बुकींग) करावे..! असे डॉ. भूषण कर्डिले, महासचिव- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांनी कळविले आहे.