संताजी महाराजांनी संत तुकारामांच्या गाथा लिखान केले आज तुकोबाच्या गाथा पंचक्रोशित या जागत सर्वदूर प्रचलित आहेत त्या संत संताजी जगानाडे महाराज यांच्यामुळेच. संताजी महाराज हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी जनी मनी कधिच तुकोबा ची साथ सोडली नाही. असे सांगत की संतु अणि तुकोबा यांनी एकमेकांना वचनबद्ध केले होत कि जो कोणी पहीले या जगाचा निरोप घेईल त्यांने दुसऱ्याच्या वैकूंठगमनाच्या वेळी उपस्थित रहायचे. जेव्हा तुकोबा वैकुंठ ला निघून गेले तेव्हा संताजी महाराज उपस्थित होते. मात्र जेव्हा संताजी महाराजांनी प्राण त्याग केला तेव्हा त्यांची पुरतीक्रिया मध्ये त्यांचा देह कीतीही माती टाकली तरी वर येत होता. शेवटी तुकोबांना वैकुंठातून परत खाली याव लागले आणि वचनपुर्ण काराव लागले. तुकाराम हे एकमेव मनुष्य आहेत जे वैकुंठातून परत भूतलावर आले होते. तेही संताजी महारांच्यासाठीच.... असे हें महान संत श्री संताजी महाराज जगनाडे