समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून आणणे ही काळाची गरज आहे. अन्यथा बहुसंख्य असलेला हा समाज मूठभर लोकांच्या पायदळी तुडवला जाईल त्यामुळे समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून वैचारिक क्रांती घडवून आणावी यातच समाजाचा उद्धार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक संत वाङमयाचे अभ्यासक संजय येरणे यांनी केले. संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्यावतीने संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन व कीर्तन कार्यक्रम बाजार चौक नगरपंचायत चामोर्शी येथे आयोजित केले होते. याप्रसंगी अध्यस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्रा. रमेश पिसे, कीर्तनकार सप्त खंजिरी वादक बाल समाज प्रबोधनकार भाविका खंडाळकर नागपूर या उपस्थित होत्या.
प्रारंभी सकाळी संताजीची रथयात्रा शिवाजी चौक चामोर्शी येथून काढण्यात आली. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे यात ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय, भजन मंडळ शालेय विद्यार्थी गावातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे संताजी स्नेही मंडळाने यावर्षीपासून जीवनगौरव पुरस्कार देण्याचा मानस ठेवून हा सन्मान मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांना देण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी राम सातपुते, नायब तहसीलदार अमोल गव्हारे, आरटीओ केतन बारसागडे, पोलीस शिपाई दिपाली, बुरांडे, पीएसआय सचिन वासेकर, सिव्हिल इंजिनिअर योगेश बुरांडे, ज्युनिअर इंजिनिअर संजय बोदलकर, एसआरपीएफ शुभम चलाख, सौरभ वासेकर, राकेश भुरसे, अंकुश नैताम, आरोग्य सेवक निखिल चलाख, साहित्यिक देवाजी धोडरे, इयत्ता दहावीचे छकुली वासेकर, श्रुती जुवारे, हर्षल मोगरकर, बारावीचे विद्यार्थी कामिक्षा कोठारे, सानिया वासेकर, पल्लवी वासेकर, भाग्यश्री उडान, सेविकांत दुधबावरे, सुरज वासेकर आणि बुद्धिबळ भाग्यश्री भांडेकर यांचा
सत्कार व सन्मान करण्यात आला.
तसेच नवनिर्वाचित नपं उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, नगरसेवक निशांत नैताम, राहुल नेताम, काजल नैताम, आशिष पिपरे, सोनाली पिपरे, स्नेहा सातपुते यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बहुमान करण्यात आला.