साकोली, - संताजी बहुउद्देशीय विकास संस्थेच्यावतीने संताजी नगर सानगडी येथील सभागृहात संताजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन 5 फेब्रुवारीला करण्यात आले आहे. याप्रसंगी सकाळी 9 वाजता संताजींच्या मूर्तीचा अभिषेक व घटस्थापना ईश्वरदास गिऱ्हेपुंजे महाराज, दत्तात्रय गाडे महाराज यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वाजता संताजी महिला मंडळाचे हळदीकुंकू तर दुपारी 12 वाजता गुणवंत विद्यार्थी आणि विविध नवनिर्वाचित संस्थेवरील पदाधिकाऱ्यांचा सत्कार होईल. उदघाट्क आ. नाना पटोले, भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपंजे यांच्या अध्यक्षतेखाली आ. अभिजित वंजारी, जि.प. अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, अॅड. धनराज खोब्रागडे, बाजीराव तुळशीकर, से.नि.प्राचार्य सुभाष बावनकुळे, वसंत बोरकर, जि.प.सदस्य नारायण वरठे, पं. स. सदस्य कृष्णा कोयाडवार, सरपंच सविता उपरीकर, हेमराज भाजीपाले, प्रा. नरेश देशमुख, उत्तम वाडीभस्मे, चक्रधर खंडाईत, संदीप बावनकुळे, हरिश्चंद्र झिंगरे व अन्य मान्यवर उपस्थित राहतील, असे संस्थाध्यक्ष वासुदेव खंडाईत, उपाध्यक्ष भोजराज बावणकर, सचिव वसंत खंडाईत, सहसचिव तुळशीदास खंडाईत, कोषाध्यक्ष अंताराम चांदेवार यांनी कळविले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade