महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांच्या मार्गदर्शनात आज उमरेड येथील मा. आगार प्रमुख कटरे मॅडम, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना 10 वी-12 वी बोर्ड परिक्षा काळात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गावात बस वेळेवर पोहचविण्या बाबद निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांना सांगितलं की ग्रामीण भागातून उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातून बहुतांश विद्यार्थी हे उमरेड येथे परिक्षेला येतात. या मुलांना परिक्षेकाळात गैरसोय होऊ नये तसेच परिक्षा केंद्रावर पोहचायला विलंब होऊ नये. त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक गावी बस पोहचवुन मुलांना सूविधा देण्यात यावी.
तसेच जिथे कुठे शालेय मुलांनी बसला हात दाखविताच ती बस थांबविण्यात यावी जेणेकरून विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोहचू शकेल असे आदेश द्यावेत ही विनंती केली याप्रसंगी निवेदन देत असताना संघटनेचे तालुका अध्यक्ष अंकुश बेले, युवा आघाडी विभागीय सचिव संजय घुगुस्कर, महिला आघाडी अध्यक्ष गीता आगासे, प्रणिता पडोळे, प्रभाकरराव बेले, सुधाकर पडोळे, चेतन पडोळे, वैशाली बांद्रे, मनीषा मुंगले, सोनल बालपांडे, सोनाली चंदनखेडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.