तेली समाज सामुहिक विवाह समिती, नागपूर १७ वा सामुहिक विवाह सोहळा १८ मार्च २०२३, शनिवार, वेळ - सकाळी ९.३० वाजता विवाह स्थळ : संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी क्वॉर्टर, बुधवार बाजार (विमा दवाखान्याजवळ), नागपूर नं. ८४४६०५५१२५
समाज बांधवांना जाहीर निवेदन तेली समाज सामुहिक विवाह समिती नागपूरच्या वतीने व समाज बांधव आणि दानदात्यांच्या सहकार्याने नागपूर शहरामध्ये मागील १८ वर्षापासून सतत समाज बांधवाच्या मुला - मुलींकरिता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार १८ व्या सामुहिक विवाह सोहळ्याचे शनिवार दि. १८ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. हा विवाह सोहळा संताजी सांस्कृतिक सभागृह, सोमवारी क्वार्टर, बुधवार बाजार (विमा दवाखान्याजवळ), नागपूर येथे होणार आहे. या सोहळ्यात समाजातील शाखा पोटशाखेतील विवाह जुळलेल्या मुला / मुलींनी भाग घ्यावे असे आव्हान करण्यात येत आहे. समाजातील सामुहिक विवाह ही काळाजी गरज झालेली आहे. यामुळे वैयक्तिकरित्या विवाह समारंभाला होणारा अनाठायी खर्च, श्रम व वेळ टाळणे आजच्या आधुनिक युगात गरजेचे आहे. तरी समाजामध्ये मुला - मुलींचे लग्न जुळल्याबरोबर सोहळ्यास तन - मन - धनाने सहकार्य करावे ही समाज बांधवांना विनंती आहे.
सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वर-वधूंना व कुटूंबीयांना खालीलप्रमाणे सवलती राहतील.
वर व वधू दोन्ही परिवारांना प्रत्येकी ३००० /- रुपये नोंदणी फी समितीकडे जमा करावी लागेल. वधूना संसार उपयोगी एक स्टील आलमारी व पाच भांडे देण्यात येईल. नवरदेवाची मिरवणूक व्यवस्था समितीकडे राहील. (घोडा व बँड बाज्यासहित) बाहेरगावावरून येणाऱ्या वर - वधू कडील मंडळीची भोजन व राहण्याची व्यवस्था समितीकडे विवाह स्थळी राहील. वर-वधूंच्या पालकांचा तसेच जोडपे नोंदणी करण्यामध्ये सहयोग करणाऱ्या व्यक्तिचा (समन्वयकाचा) सत्कार करण्यात येईल.
विनीत तेली समाज सामुहिक विवाह समिती, नागपूर ई / ११६, नंदनवन कॉलनी, नागपूर नों. क्र. एफ २५५७१ नागपूर
कार्यकारिणी मंडळ स्वामी बा. भद्रे अध्यक्ष ९४२३४०४५४१ विनायकराव पुं. तुपकर उपाध्यक्ष ९३७२५६२२३९ अभय शां. घाटोळे सचिव ९८२२७२८१२१ सौ.बबीताताई म.मेहर सहसचिव ९५५२२७७४७९ केशवानंद रा. सुरकार कोषाध्यक्ष ९२२६५९२८७९ मोहन बा. आगाशे कार्यकारीणी सदस्य ८८८८८५७२५४ / ९८२२५७३८९४ अॅड. पुरुषोत्तम घाटोळे कार्यकारीणी सदस्य ९४२३६३०८२६ मुरलीधरजी ठोंबरे कार्यकारीणी सदस्य ९३७२९३८१९३ मारोतराव चिं. पाटील कार्यकारीणी सदस्य ९०९६३४४९७१ संतोषराव रेवतकर कार्यकारीणी सदस्य ९२२५३४०८१३ जनार्धनजी हटवार कार्यकारीणी सदस्य ९०२१११५९६७ नारायण आंबटकर कार्यालय प्रमुख ९७६५६९९२४२