खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीचा अभिनव उपक्रम - महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार

    धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या पदाधिकारींनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करून एक अभिनव उपक्रम राबवला व आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.

Khandesh teli Samaj Mandal Mahila aghadi jagtik Mahila Din    धुळे शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या अमोल मॅटर्निटी हॉस्पिटल या ठिकाणी आज मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व महिला दिनाच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करण्यात आले. खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सौ.सविता प्रताप चौधरी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.

Khandesh teli Samaj Mandal Mahila aghadi Mahila Din    सौ. हर्षदा शाम ठाकूर,सौ. स्वाती मनचोर या मातांचा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ.कल्पना अशोक चौधरी,सौ.भारती कैलास चौधरी, महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीमती आशा अजय चौधरी, सौ. वंदना मोतीलाल चौधरी, सौ. रिटा बागुल, सौ. प्रतिभा चौधरी व पदाधिकारींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

दिनांक 10-03-2023 07:12:29
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in