उमरेड : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा उमरेड तथा नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने प. दीनदयाल नाट्य सभागृह, उमरेड येथे दिनांक ११ मार्चला विविध क्षेत्रातील व विविध समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या (५१) महिलांना सन्मानित करण्यात आले.
समाजातील महिला, तरुण व ज्येष्ठांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या छत्राखाली एकत्रित करण्याचे काम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश एन. वैद्य यांनी केले. याची दखल घेत कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उदघाटक उमरेड विधानसभा क्षेत्राचे आ. मा राजूभाऊ पारवे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. वंदनाताई वनकर उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी, प्रमुख अतिथी मा. खा. कृपालजी तुमाने रामटेक लोकसभा, मार्गदर्शक मा. सुप्रिया बावनकुळे सहसंचालक उद्योग नागपूर विभाग, सुरभी शिरपूरकर उत्कृष्ट लोकमत पत्रकार, प्रमुख पाहुणे मा. चंद्रभानजी खंडाईत उपविभागीय अधिकारी उमरेड, मा. मंगेशजी खवले मुख्याधिकारी नगरपरिषद उमरेड, प्रमुख उपस्थिती माजी आ. मा. सुधीरभाऊ पारवे, माजी नगराध्यक्ष मा. गंगाधरराव रेवतकर, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश एन. वैद्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मा. संजयराव मेश्राम, नागपूर मा. सुषमाताई लाखे, शालिनीताई तेलरांधे, प्रज्ञाताई बडवाईक, मा. नंदकिशोर दंडारे, नागपूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष पुष्कर डांगरे, मा हरिश्चंद्र दहाघाने, मा. संजय घुगुसकर, मा.संदीप इटकेलवार, मा. गीतांजली नागभीडकर सभापती पंचायत समिती उमरेड, जयश्री देशमुख, संगीता पडोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात एक छान अशा स्वागत व मधूर गीताने झाली यात 21 महिलानी सहभाग घेत रानी लक्ष्मीबाई, जीजामाता सावित्रीबाई फुले, महाकाली, डॉक्टर व वकील रुपात सहभाग घेतला. मान्यवरांचे हस्ते प्रथम दीपप्रज्वलन केले महिलांनी कलाकॄतीतून साकारलेल्या रांगोळी व पुष्पगुच्छ या वेळी मुख्य आकर्षण ठरले. दरम्यान या कार्यक्रमात हजारोहून अधिक महिलांनी या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. एवढे भले मोठे नाट्यगृह आज खचाखच भरले होते. आजवर कोणत्याही समाजाच्या माध्यमातून एवढे मोठे व्यासपीठ या विधानसभेत बघावयास मीळाले नाही असे प्रत्येक उपस्थित असलेल्या महिला व पुरुषांनी गौरव उद्गार काढले. अर्थातच महिलांचा सत्कार हे एवढं सगळं आजवर कुणीही केलेल नव्हते. म्हणुन उमरेड येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा च्या माध्यमातून विविध जातीतील होतकरू महिलाची नोंद घेऊन ते समाजात त्याची काय भूमिका आहे व त्यांचा आपण काय सत्कार करायचा याचा अभ्यास करण्यासाठी जो कस लागला तो प्रशंसनीय आहे. सत्कार करता़ंना तो योग्य सत्काराचा खरच मानकरी आहे काय हे शोधून काढणे व त्याला एकत्रित आणणे ही देखील एक वेगळीच कला आज महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा उमरेड ने दाखवून दिले. याचे सगळ्याच माध्यमातून कौतूक झाले.
याच माध्यमातून जमलेल्या महिलांना एक पैठणी जिंकण्यासाठी जिद्द लागली होती यासाठी आयोजकांनी उपस्थित महिलांना एक कुपन दिले होते. त्या कुपनमध्ये लकी ड्रा पद्धतीने काढण्यात आला. हजारो महीलांनी हे कुपन एका बंद डब्यात भरून गोपनीयता बाळगली त्यात फक्त पैठणीच्या मानकरी ठरणारं होत्या पाच महीला दरम्यान लकी ड्रॉ मध्ये कोणतीही गफलत न करता पाच महिला या पैठणीच्या मानकरी ठरल्या व कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थित हजारो महिलांना यावेळी स्नेहभोजनाचा आस्वाद देखील आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष मा. जगदीश एन. वैद्य यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी वासुरकर, सुरेखा गोल्हर व आकाश लेंडे यांनी केले आभार महिला आघाडी अध्यक्ष गीता आगासे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रावण गवळी, यशवंत वंजारी, प्रभाकर बेले, प्रवीण गिरडे, रोशन झोडे, गणेश वासुरकर, चेतन दांडेकर, ज्ञानेश्वर घंघारे, राम वाघमारे, भूमीपाल पडोळे, संजय दाढे, दत्तू जीभकाटे, ओमप्रकाश आगासे, पोपेश्वर गिरडकर, रुपेश गिरडे, गणपत हजारे, मनीषा मुंगले, सोनाली चंदनखेडे, लता बेले, राजश्री भुसारी, मनीषा येवले, मीना दहाघाणे, संध्या वैद्य, वैशाली बांद्रे, चैताली वंजारी, सोनल बालपांडे, रेखा मुळे, वर्षा गिरडे, हर्षा वाघमारे, शालू झाडे, रेखा भुसारी, वर्षा वंजारी, माधुरी पडोळे, अंकिता लेंडे, स्नेहल वैद्य इत्यादींनी सहकार्य केले.