स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 3) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
कोणताही धर्म अमानवता शिकवत नाही. तरी आपली हुकमत ठेवण्यासाठी, आपली आर्थीक सुबत्ता येण्यासाठी धर्माचे ठेकेदार हे खोटा देव खोटा धर्म स्वत: उभा करतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. गतवर्षी बारामती येथील कुटूंबालीत साठी गाठलली माता आक्रोश करीत होती. माझी लग्नाला आलेली मुलगी धर्माच्या ठेकेदाराांच्या कळपात अडकली ती बारामती, फलटण, गोवा मार्गे पनवेलच्या अश्रमात अडकली जन्मादात्या आईला ही ती आई म्हणण्यास तयार नाही. संबंधीत संभाषण करू देत नसतील तर ही गुलामीची पाऊल वाट आहे. कोणत्या ही हिंदू धर्म ग्रंथात आईला आईम्हणु नकोस असे शिकवलेले नाही. पण स्वातंत्र्यात ही धर्म मार्तंड तेच उदयोग करित असतील तर स्वातंत्र्यात आपण कुणाचे गुलाम बनु पहाल आहोत. पुरंदर्यांच्या पुस्तकात शिवरायांनी गो ब्राहमणासाठी स्वराज्य मिळवले हे अनेक वेळा ठळक पणे नमुद केले आहे. परंतु मान वतनाची पर्वा न करता स्वातंत्र्या साठी लढणार्या आपल्या वंशंजांना माहित होते ही धर्मपीठे व मोंगली सत्ता नष्ट करावयाची. धर्मपीठाचे शेकडो वर्षांचे संदर्भच बदलून टाकले. आणी स्वातंत्र्याची दारे उघडली आणी महात्मा फुले, शाहु, गाडगे बाबा, आंबेडकर यांनी सामाजिक धार्मीक गुलामगीरीला खीळे खीळे केले. ही स्वातंत्र्याची क्रांती प्रतीक्रांतीत रूपांतरीत करण्यासाठी ब्राह्मण्याने पछाडलेले अनेक व्यक्ती संघटना वेगवेगळी सोंगे घेऊन तुम्ही आम्ही एक हे सांगतात. वरून समता आतुन विषमता करण्याचे महामार्ग तयार करता करता नवी गुलामी लादत आहेत. आपला यशाचा शौर्याचा प्रगतीचा आलेख पुसून आपण ब्राह्मण्यांसाठी कुणाविरोधात तरी संघटीत होतो. हिच विचार स्वातंत्र्याची गुलामगीरी आज उगवू लागली आहे.