धुळे - समाजातील प्रत्येक महिलेने सक्षम होऊन संस्कार जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन शेंदुर्णी येथील ह. भ. प. प्रा. डॉ. सौ. योगिता चौधरी यांनी केले. त्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी आयोजित अमृत सत्कार सोहळ्यात बोलत होते. महिला दिनाचे औचित्य साधून दाता सरकार मंगल कार्यालय, धुळे येथे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ७५ वर्षे वय पूर्ण केलेल्या ७५ महिलांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती वीना रामदास चौधरी या होत्या.
त्यापुढे म्हणाले की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेने प्रगती केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षम बनलेली आहे. परंतु ज्या क्षेत्रात महिलेने यश संपादन केले त्या क्षेत्रातले निर्णय स्वतः महिलेने घेऊन, या पदाचा अहंकार न दाखवता घरात मुलगी - सून म्हणूनच राबावे व आपल्या संस्कारांची जोपासना करावी असे त्यांनी सांगितले. आपल्या अमृतवाणीतून त्यांनी अनेक ज्वलंत विषयांवर महिलांचे प्रबोधन केले.
यावेळी नवनिर्वाचित महापौर सौ. प्रतिभा चौधरी, क्रीडापटू कु. रूपाली चौधरी, गुणवंत विद्यार्थिनी कु. उत्कर्षा चौधरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित सर्व ज्येष्ठ मातांचा यावेळी सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मोठ्या संख्येने ज्येष्ठ माता - भगिनी व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी महापौर सौ. प्रतिभा चौधरी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, समाजातील सर्व महिलांनी संघटित होऊन काम केले तर समाजाचा विकास होऊ शकतो. समाजातील सर्व महिलांनी आता एकत्र येऊन समाजाचा विकास साधला पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी तेली समाजाच्या जिल्हा अध्यक्ष सौ. सुमन काकू महाले यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिला सक्षमीकरणावर अहिराणी कविता सादर करून उपस्थित सर्व माता-भगिनींची मने जिंकलीत.
यावेळी व्यासपीठावर माजी महापौर सौ. जयश्रीताई अहिरराव, माजी नगरसेविका सौ.अलकाताई चौधरी, माजी महिला बालकल्याण सभापती सौ.वंदना थोरात, महिला मंडळ माजी अध्यक्ष सौ.आरती महाले, तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ.दिपिका युवराज चौधरी, श्रीमती गायत्री चौधरी, औरंगाबाद, श्रीमती आशा अजय चौधरी, विभागीय अध्यक्ष सौ.मालती चौधरी, जिल्हाध्यक्ष सौ.कल्पना चौधरी, शहराध्यक्ष सौ. भारती चौधरी, जिल्हा सचिव सौ. सविता चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. शाळकरी मुलींनी स्वागत गीत सादर करून भक्ती गीतांवर सुंदर असे नृत्य केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. कल्पना सोनवणे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सौ. शुभांगी मुकेश चौधरी, सौ. सपना रवींद्र चौधरी, सौ. समिधा सचिन सूर्यवंशी ,सौ. भारती कैलास चौधरी सौ. वंदना दिपक चौधरी ,सौ. भारती भागवत चौधरी, श्रीमती लताताई संतोष चौधरी, सौ. रंजना मनोज चौधरी ,सौ. मनीषा संजय चौधरी, सौ. जयश्री महेश बाविस्कर, सौ. रिटा बागुल, सौ. छाया भगवान चौधरी, सौ. छाया गणेश चौधरी, श्रीमती शोभा चंद्रकांत पवार ,सौ. शितल भूषण चौधरी ,सौ. ललिता रवींद्र चौधरी, सौ. शोभा प्रभाकर नेरकर, सौ. विद्या संजय चौधरी, सौ. कल्याणी दीपक चौधरी, सौ. ज्योती संजय नेरकर, सौ. भारती अनिल चौधरी सर्व महिला पदाधिकारींनी अथक परिश्रम घेतले.