देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट मा. जयदत्तआण्णा क्षिरसागर यांनी घेतली. अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तेली समाजाच्या काही महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन घेऊन सन्माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घेतली. पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा केली.
काही ठळक मागण्या :
१. ओबीसी जातींची जनगणना करण्यासाठी १९९४ साली सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला ओबीसी जातींच्या लोकसंख्येचे विवरण मागितले होते. त्यावर सरकारने २०११ साली जातीनिहाय जनगणना करून अहवाल सादर करण्याबाबत आश्वासन दिले होते. आज २०१५ पर्यंत ओबीसी जातींच्या संख्यांमध्ये वाढ झालेली आहे. परंतु तरीदेखील सरकारने अजून पर्यंत जनगणना जाहीर केलेली नाही. तरी कृपया ही जनगणना जाहीर करावी.
२. तेली समाजाचे महान संत कर्मा माता यांच्या नावे डाक तिकीट प्रसिद्ध करण्यासाठी भारत सरकार कडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. भारत सरकारने देखील हि मागणी मान्य केलेली आहे. मात्र अजून पर्यंत कर्मा माता यांच्या नावे डाक तिकीट प्रसिद्ध झालेले नाही. तरी कृपया त्वरित या विषयी निर्णय घ्यावा आशी मागणी देखील त्यांनी केली.